राम चरणच्या ‘पेड्डी’चं नवीन शेड्यूल पुण्यात सुरू! ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार
‘पेड्डी’ चं पुढचं शेड्यूल आजपासून पुण्यात सुरू होत आहे.

Ram Charan film Peddi In Pune : ग्लोबल सुपरस्टार राम चरण, ज्यांनी आपल्या आधीच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांमध्ये प्रचंड धूम माजवली होती, ते आता त्यांच्या अत्यंत प्रतिक्षित चित्रपट ‘पेड्डी’ घेऊन मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. चित्रपटाच्या घोषणेनंतरच चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात राम चरण एका दमदार अॅक्शन अवतारात दिसणार असून, त्यांची ही नव्या रुपातील झलक आधीच चर्चेचा विषय बनली आहे.
भव्य गाण्याचं शूटिंग
जशी जशी चित्रपटाची शूटिंग पूर्णत्वाकडे जात (film Peddi) आहे, तसतशा नव्या अपडेट्समुळे चाहत्यांचा उत्साह आणखी वाढतोय. ताज्या माहितीनुसार, ‘पेड्डी’ चं पुढचं शेड्यूल आजपासून पुण्यात सुरू होत आहे, जिथे एक भव्य गाण्याचं शूटिंग होणार (Ram Charan) आहे. हे गाणं ‘मास ब्लॉकबस्टर’ ठरण्याची शक्यता वर्तवली जात असून, याचे कोरिओग्राफी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर जानी मास्टर (Blockbuster Song) करत आहेत, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय डान्स नंबरसाठी ओळखले (Entertainment News) जातात.
थरारक कथा आणि हाय व्होल्टेज
आतापर्यंत या चित्रपटाचं सुमारे 60% शूटिंग पूर्ण झालं असून, अलीकडेच चित्रपटाच्या पहिल्या भागाचं एडिटिंगही फायनल करण्यात आलं आहे. बुची बाबू सना दिग्दर्शित हा चित्रपट राम चरणला एका अशा अवतारात सादर करतोय, जो प्रेक्षकांनी याआधी कधीच पाहिला नाही – ज्यात अॅक्शन, थरारक कथा आणि हाय व्होल्टेज एंटरटेनमेंटचा उत्तम मिलाफ असणार आहे.
बुची बाबू सना यांच्या लेखन व दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘पेड्डी’ या चित्रपटात राम चरणसोबत शिवराजकुमार, जान्हवी कपूर, दिव्येंदू शर्मा आणि जगपति बाबू मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. वेंकटा सतीश किलारु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, हा चित्रपट 27 मार्च 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.