Ram Charan: सलमानसोबत ‘येंतम्मा’ गाण्यावर डान्स केल्यानंतर राम चरणची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘माझं स्वप्न…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T112041.715

Yentamma Song Dance : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामधील काही गाणी रिलीज झाली आहेत. ‘येंतम्मा’ या धमाकेदार गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)


या गाण्यात सलमान खान, साऊथ सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि दग्गुबती व्यंकटेश (Daggubati Venkatesh) हे तिघेही एकत्र डान्स करताना दिसत आहे. या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जवळपास ४३ मिलियन्सहून जास्त व्ह्यूज या एका गाण्याला मिळाले आहेत. राम चरणनं ‘येंतम्मा’गाण्यात डान्स केल्यावर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात ‘येंतम्मा’ या गाण्यात राम चरणने डान्स केला आहे. या गाण्यात डान्स करत असताना आलेल्या अनुभवाविषयी त्याने सांगितले आहे. ‘हे गाणे खूप धमाकेदार आहे, हे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक गाणं आहे. या गाण्यावर चाहते डान्स करु शकतात. सलमानबरोबर डान्स करायचं माझं स्वप्न होतं, हे स्वप्न आता पुर्ण झाले आहे.

हे गाणे शूट करत असताना खूप मजा आम्ही केली आहे. खूप खूप धन्यवाद सलमान भाई. लव्ह यू सो मच.’ असं राम चरण म्हणाला आहे. ‘येंटम्मा’ हे गाणं पायल देवनं संगीतबद्ध केले आहे. हे गाणं रफ्तार, विशाल ददलानी आणि पायल देव यांनी एकत्र येऊन गायले आहे. शब्बीर अहमद हे या गाण्याचे गीतकार आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी जानी मास्तर यांनी केले आहे.

Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

‘किसी का भाई किसी की जान’ कधी होणार रिलीज?
२१ एप्रिल २०२३ रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेबरोबरच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सलमान खानच्या या चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube