Ranveer-Aalia च्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानीचं’ नव पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Ranveer-Aalia च्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानीचं’ नव पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Rocky aur Rani ki Prem kahani New Poster Lunch : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला रणवीर सिंग आणि आलिया भटचा (Ranveer-Aalia) चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky aur Rani ki Prem kahani) या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आल्यापासूनच या चित्रपटाची आणि आलियाच्या (Aalia) लूकची प्रचंड चर्चा आहे. त्यामध्ये आता या चित्रपटाचं नवं पोस्टर लॉन्च झालं आहे. (Ranveer-Aalias Rocky aur Rani ki Prem kahani New Poster Lunch Movie Will Come this day )

Rahul Gandhi Birthday : 2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होणार? 53 व्या वाढदिवशी अंकशास्त्र काय सांगतं?

लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. करण जौहर आणि आलियाने या चित्रपटाचं नवं पोस्टर लॉन्च केलं आहे. हे पोस्टर सध्या चांगलच व्हायरल होत असून त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पोस्टरमध्ये दाखवलेल्या आलियाच्या लूकने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. ती यामध्ये लाल रंगाची साडी परिधान केलेली दिसत आहे. तर पारंपारिक वेशात रणवीर देखील नेहमीप्रमाणे हटके दिसत आहे.

या चित्रपटाचा टीझर उद्या 20 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दल दिग्दर्शक करण जोहरने आज रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाचं दुसरं पोस्टर शेअर करताना माहिती दिली आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 28 जुलै 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Balasaheb Thackeray: मराठी अस्मिता जपणारा झुंजार नेता, बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणचित्रं…

या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि आलिया भटच्या प्रमुख भूमिका असणार आहेत तर त्यांच्याबरोबर धर्मेंद्र, जय बच्चन आणि शबाना आझमी या दिग्गजांची फौज असणार आहे. करण जोहरने हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाबद्दलची उत्सुकता त्याने शेअर केलेल्या पोस्टवरून दिसून येत आहे.

Adipurush : ‘आदिपुरुष’ सिनेमाचा नालासोपाऱ्यातील शो हिंदू संघटनांनी पाडला बंद

काय म्हणाला करण जौहर?

रणवीर सिंग आणि आलिया भटच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत करण जौहरने लिहिले की, ‘ही प्रमाच्या काळाची सुरूवात आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ टीझर उद्या येणार आहे. आताचं रिमांडर लावा. तर चित्रपट 28 जुलै 2023 प्रदर्शित होणार.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube