संध्या शांताराम यांच्या आठवणींना उजाळा; ‘झनक झनक पायल बाजे’ चे खास प्रदर्शन

Sandhya Shantaram यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

Sandhya Shantaram

Relive the memories of Sandhya Shantaram; Special screening of ‘Jhanak Janak Payal Baje’ : अमर भूपाळी, नवरंग, पिंजरा अशा लोकप्रिय चित्रपटात भूमिका करणाऱ्या अभिनेत्री संध्या व्ही. शांताराम यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांची प्रमुख भूमिका असलेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटाचे प्रदर्शन शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर 2025 रोजी, राजकमल स्टुडिओ, परळ येथे संध्याकाळी 5 वाजता करण्यात येणार आहे.

शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं की परत मिळण्याची गॅरंटी म्हणून…, फडणवीसांनी भर मंचावरून सांगून टाकलं

या प्रसंगी किरण व्ही. शांताराम आणि चित्रपट अभ्यासक अरुण पुराणिक संध्या बाईंच्या आठवणींना उजाळा देणार आहेत.या कार्यक्रमाचे आयोजन राजकमल कलामंदिर, व्ही. शांताराम फॉऊंडेशन, एशियन फिल्म फॉउंडेशन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि प्रभात चित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले असून, सर्व रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खुला आहे.

महाराष्ट्र सरकारचा मोठा विक्रम! एलोन मस्कच्या स्टारलिंकशी करार करणारे ठरले देशातील पहिले राज्य

आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं 4 ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या.झनक झनक पायल बाजे, दो आंखें बारह हाथ आणि विशेषत: पिंजरा चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील. संध्या शांताराम यांचं खरं नाव विजया देशमुख होते. त्या प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी १९५० आणि १९६०च्या दशकात सक्रीय काम केलं. त्या एक उत्कृष्ट अभिनेत्री असण्यासोबतच दिग्गज नृत्यांगणा म्हणूनही ओळखल्या जात होत्या. त्यांच्या अनेक भूमिकांमध्ये त्यांनी अप्रतिम नृत्य सादर केलं.

मदत म्हणून तुमच्या कोपराला गूळ लावतात; उद्धव ठाकरे आजपासून चार दिवसांसाठी मराठवाडा दौऱ्यावर

संध्या शांताराम यांनी त्यांच्या चित्रपटांमधून भारतीय चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान अमूल्य आहे. विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामुळे त्यांचे नाव आजही मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात महत्त्वाचं मानलं जातं. ‘पिंजरा’तील त्यांच्या नृत्याची आणि अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. १९५९ साली आलेल्या व्ही. शांताराम यांच्या नवरंग सिनेमातून संध्या यांनी कमाल दाखवली होती. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे.

follow us