Rishi Kapoor Birth Anniversary: ‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे ‘हे’ सिनेमा पाहिलेत का?

Rishi Kapoor Birth Anniversary: ‘चिंटू’ या नावाने प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांचे ‘हे’ सिनेमा पाहिलेत का?

Rishi Kapoor Birth Anniversary: मनोरंजन क्षेत्रातील लाडका ‘चिंटू’ अर्थात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचा आज वाढदिवस. (Rishi Kapoor) मनोरंजन क्षेत्रातील हटक्या अभिनेत्यांमध्ये ऋषी कपूर यांच्या नावाचा समावेश होतो. ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ दिवशी हिंदी सिनेमाचे दमदार सुपरस्टार राज कपूर (Raj Kapoor) यांच्या घरी झाला. फिल्मी वातावरणामध्ये वाढलेल्या ऋषी कपूर यांनी अगदी लहान वयात अभिनयाला क्षेत्रात एन्ट्री केली. ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमात ते बालकलाकाराच्या भूमिकेमध्ये बघायला होते. या सिनेमात छोटीशी भूमिका साकारून त्यांनी आपल्या सिनेमा प्रवासाची सुरुवात केली होती. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेऊया त्यांच्या काही गाजलेल्या सिनेमाबद्दल…

अग्निपथ
२०१२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ या सिनेमात हृतिक रोशन मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळाला होता. या सिनेमाचा मुख्य खलनायक संजय दत्त असला तरी, अभिनयाच्या बाबतीमध्ये ऋषी कपूर या दोघांपेक्षा हटके ठरले होते.

बॉबी
‘बॉबी’ या सिनेमातून ऋषी कपूर यांना त्यांचे वडील राज कपूर यांनी मुख्य अभिनेता म्हणून प्रदर्शित करण्यात आले होते. या सिनेमात त्यांची को-स्टार म्हणून अभिनेत्री डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.

Chandramukhi 2: खिळवून ठेवणारा थरार अन् कंगना रणौतचं जबदस्त लूक; बहुचर्चित ‘चंद्रमुखी २’चा ट्रेलर प्रदर्शित

डी डे
२०१३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डी डे’ या सिनेमात ऋषी कपूर यांनी एका गँगस्टरची मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये इरफान खान, अर्जुन रामपाल, श्रुती हासन आणि हुमा कुरेशीसारखे बॉलिवूड कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये झळकले होते.

अमर अकबर अँथनी
अमर अकबर अँथनी या सुपरहिट सिनेमात बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन, विनोद खन्ना यांच्याबरोबर ऋषी कपूर देखील दिसले होते.

कर्ज
‘कर्ज’ हा ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट सिनेमा होता. या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाची लोकांनी जोरदार प्रशंसा केली होती. या सिनेमाने देखील बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube