रूपाली गांगुली सादर करणार ‘दिल की बातें’, 9 जूनपासून मिनी-सीरीज प्रेक्षकांच्या भेटीला

Rupali Ganguly Dil Ki Baatein Mini Series on Star Plus : रंजक आणि हृदयस्पर्शी आशय सादर करण्याची परंपरा कायम (Entertainment News) ठेवत, रसिक प्रेक्षकांसमोर नेहमीच ताज्या विषयांवरील अर्थपूर्ण कथा सादर करणारी ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनी लवकरच ‘दिल की बातें’ (Dil Ki Baatein Mini Series) ही नवी मिनी-सीरीज पेश करीत आहे.
अनुपमा ऊर्फ रूपाली गांगुलीसह (Rupali Ganguly) सादर केल्या जाणाऱ्या या मालिकेत मुलांसोबतचा हृदयस्पर्शी संवाद प्रेक्षकांकरता एक आनंदनिधान ठरेल. अनोखी संकल्पना घेऊन आलेल्या या कार्यक्रमाद्वारे अनुपमा एक मार्गदर्शक आणि सुहृद म्हणून एका नव्या भूमिकेत पाऊल ठेवत आहे. उत्साही आणि भावोत्कट वातावरणात त्या मुलांच्या गटाशी प्रामाणिक संवाद साधीत ही मालिका हास्य, निरागसता आणि जीवनाचे धडे देणारे आश्वस्त वातावरण निर्माण करेल.
दबाव टाकून, धमकावून हे प्रकरण दाबलं; मंत्री शिरसाटांच्या मुलाच्या प्रकरणात दमानियांचा आरोप
‘दिल की बातें’ हा कार्यक्रम अनुपमाच्या शहाणपणाचे आणि मुलांच्या प्रामाणिक, निरपेक्ष जगाचे एक नेमके टिपण सादर करेल. खेळकर चर्चा, हृदयस्पर्शी क्षण आणि न संपणारे हास्य याद्वारे, या मालिकेचा प्रत्येक भाग सर्व वयोगटातील प्रेक्षकांकरता काहीतरी खास सादर करेल.
View this post on Instagram
रूपाली गांगुलीचा खास लाघवी स्वभाव आणि गोंडस बालकलाकार यांसह, ही मालिका प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याकरता, जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि कायमस्वरूपी आठवणी निर्माण करण्याकरता सज्ज झाली आहे. तुम्ही अनुपमाचे जुनेजाणते चाहते असाल अथवा आनंदी, रंजक कौटुंबिक कार्यक्रमाच्या शोधत असाल, तर ही मालिका नक्कीच तुमच्याकरता योग्य आहे.
विवाह हा सोहळा नाही तर इव्हेंट होतोय का? दिवसाला दीड कोटी, वैष्णवीच्या लग्नात ओतला पाण्यासारखा पैसा
9 जूनपासून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर संध्याकाळी साडेसहा वाजता ‘दिल की बातें’ हा कार्यक्रम पाहायला विसरू नका आणि हसू, प्रेम, आंतरिक भावनेला साद घालणारा असा अत्यंत प्रभावी कार्यक्रम पाहायला विसरू नका!