Sai tamhankar: सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘देखणा पैलवान माझ्या…’

Sai tamhankar: सई ताम्हणकरने अफेअरबाबत केला होता धक्कादायक खुलासा; म्हणाली, ‘देखणा पैलवान माझ्या…’

Sai tamhankar: सई ताम्हणकर (Sai tamhankar) हे नाव आजच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मराठी कलाविश्वातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून कायम सईकडे पाहिलं जातं. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या सईने मराठीसह हिंदी कलाविश्वातही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. (affair) सईचा खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ती बऱ्याचदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते. तसेच अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलिवूड (Bollywood)  मध्येही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)


‘आयफा’, ‘फिल्मफेअर’ (Filmfare) यांसारखे नावाजलेले पुरस्कार तिने पटकावले. रुपेरी पडद्यावर ती साकारत असलेल्या भूमिकांचं विशेष कौतुकही होताना दिसतं. भूमिकांमुळे तसेच कामामुळे चर्चेत असणाऱ्या या अभिनेत्रीचं खासगी आयुष्य काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. तिचं रिलेशनशिप, अफेअर, लग्न याबाबत यापूर्वीही अनेक चर्चा रंगल्या आहेत. अमेय गोसावी या व्यक्तीशी सईचे लग्न झालं होतं. मात्र तिचं हे लग्न फार काळ टिकलं नाही. सईने तिच्या लग्नाबाबत काही मुलाखतींमध्ये मोठा खुलासा केले होते.

तसेच तिने एका कार्यक्रमात तिच्या रिलेशनशिपबाबत (Relationship) धक्कादायक खुलासा केला होता. झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात सई तिच्या खासगी आयुष्याबाबत भरभरुन बोलली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यान सांगलीहून मुंबईमध्ये आली असताना तिचं एका व्यक्तीबरोबर अफेअर असल्याचं तिने सांगितलं होतं. सई म्हणाली होती की, “एक खूप देखणा पेहलवान माझ्या आयुष्यात होता.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तुम्ही मुंबईमध्ये आल्यावर हे शहर तुमच्या कानशिलात लगावतं आणि सांगत असतं, नेहमीच प्रॅक्टिकल राहा. तरचं तुम्ही इथे जगू शकणार आहात. हेच लक्षात ठेवून मीही सांगलीवरुन थेट मुंबईमध्ये आले होते. अनिश्चित काळासाठी मी या शहरात आले. त्यावेळी मलाही काही निर्णय घेणं गरजेचं होतं. जगा आणि जगू द्या, या वाक्यावर मला खूप विश्वास आहे.

मी तो एक निर्णय घेतला. आमचं नातं पुढपर्यंत गेलं नाही. अजूनही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. त्याचं आता लग्न झालं आहे. त्या व्यक्तीचं नाव मला आता सांगायचं नाही. मात्र तो खरंच खूप हॉट आहे”. सईने अगदी दिलखुलासपणे या कार्यक्रमात सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलं होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube