Bawal: वरुण धवन अन् साजिद नाडियाडवालाचा ‘बवाल’ ठरला सुपरहिट! काय आहे कारण?

Bawal: वरुण धवन अन् साजिद नाडियाडवालाचा ‘बवाल’ ठरला सुपरहिट! काय आहे कारण?

Bawal: रिलीजच्या पहिल्या आठवड्यात, वरुण धवन (Varun Dhawan) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘बवाल’ या हिंदी चित्रपटाने संपूर्ण देशात तुफान लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येत आहे. आणि या सिनेमाची सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार चर्चा होत असल्याचे दिसत आहे. चित्रपटाने आधीच ७ दशलक्ष व्ह्यूज ओलांडले आहेत, यामुळे तो सुपरहिट ठरल्याचे दिसून आला आहे, आणि एक महत्वाचा स्थान मजबूत केल्याचे बघायला मिळत आहे. चित्रपटाचे मनमोहक कथन नातेसंबंधात आलेल्या आव्हानांचा शोध घेत असल्याचे दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)


अजय (वरूण धवनने साकारलेली) आणि निशा (जान्हवी कपूरने साकारलेली) यांची प्रेम कहाणी अतिशय सुंदरपणे विणली जात आहे. या सिनेमाचे ‘दंगल’चे दिग्दर्शक नितेश तिवारी (Director Nitesh Tiwari) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट पहिल्यांदा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात वरुण-जान्हवीच्या प्रेमकहाणीत ट्विस्ट असल्याचे पाहायला मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने ट्रेलर शेअर करत “प्रेम ते ‘बवाल’पर्यंतचा प्रवास! असे कॅप्शन देण्यात आले होते.

तसेच सुरुवातीला वरुण धवन एका इतिहास शिक्षकाची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवत असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे त्याचे लग्न होते आणि दोघेही फिरायला युरोपला जात असल्याचे दिसून आले आहे. चित्रपटात जान्हवी कपूरने निशा तर वरुण धवनने अजय ही भूमिका साकारली आहे. 21 जुलैला ‘बवाल’ अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पहिल्यांदा  प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितल्यानुसार, “प्लॅनिंगनुसार, अ‍ॅक्शन सीनसाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

बवालसाठी एका दिवसाच्या शूटिंगसाठी सुमारे २.५ कोटी खर्च आला आहे, आणि चित्रपटाचे १० दिवसांचे शेड्यूल होते. वरुणचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट तयार झाला आहे.”सुत्रांनी पुढे सांगितल्यानुसार, “चित्रपट पॅरिस, बर्लिन, पोलंड, अॅमस्टरडॅम, क्राको, वॉर्सा यासारख्या महागड्या आणि मनोरंजक ठिकाणी तसेच भारतात चित्रपटाचा काही भाग शूट केला गेला. ही एक अतिशय अनोखी प्रेमकथा आहे आणि वॉर्सामध्ये एक मोठा अ‍ॅक्शन सीन शूट केला गेला. चित्रपटाचे अ‍ॅक्शन डायरेक्टर आणि स्टंटमॅन हे जर्मनीतील आहेत. चित्रपटाच्या क्रूमध्ये सुमारे 700 लोक होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube