ISPL सीझन 3 मध्ये सलमान खानच्या उपस्थितीने रंगत, चाहत्यांसोबत दिसला सुपरस्टारचा खरा कनेक्शन
Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याची चाहत्यांप्रती असलेली बांधिलकी कोणत्याही परिस्थितीपेक्षा
Salman Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने पुन्हा एकदा सिद्ध केलं की त्याची चाहत्यांप्रती असलेली बांधिलकी कोणत्याही परिस्थितीपेक्षा मोठी आहे. नुकताच ISPL सीझन 3 साठी सूरतला पोहोचलेल्या सलमान खानने हा कार्यक्रम केवळ एक क्रीडा स्पर्धा न ठेवता चाहत्यांसाठी अविस्मरणीय फॅन-फेस्टमध्ये रूपांतरित केला. स्टेडियममध्ये प्रचंड गर्दी असतानाही सलमानने मैदानाचा संपूर्ण फेरा मारला, प्रत्येक दिशेने उभ्या असलेल्या चाहत्यांना अभिवादन केलं आणि थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या गर्दीतही कार्यक्रम पूर्णपणे सुरळीत पार पडला आणि कुठेही गोंधळ पाहायला मिळाला नाही.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात सलमान खानला मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांनंतरही त्यांनी हा धोका पत्करला. सलमान शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होतेच, पण त्यांनी चाहत्यांकडे हात हलवला, जवळ जाऊन संवाद साधला आणि क्रिकेटप्रेमींसाठी टेनिस बॉल्सवर ऑटोग्राफही दिले. हे क्षण स्टेडियममध्ये उपस्थित हजारो चाहत्यांना भावूक करून गेले. चाहत्यांना स्वतः ओळख देत, मैदानाभोवती फेरी मारत प्रत्येकाशी जोडण्याचा सलमान खानचा प्रयत्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ऑनलाइन चाहत्यांच्या प्रतिक्रिया स्पष्टपणे दाखवतात की सलमान खान हे त्या मोजक्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत, जे खऱ्या कनेक्शनवर विश्वास ठेवतात. परिस्थिती कितीही कठीण असो, चाहत्यांना नेहमीच प्राधान्य देतात हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सलमान खान सध्या त्यांच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटामुळेही जोरदार चर्चेत आहेत. नुकतंच या चित्रपटातील मातृभूमी हे लेटेस्ट गाणं रिलीज झालं असून, चाहत्यांकडून त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि सोशल मीडियावर ते वेगाने ट्रेंड करत आहे. दमदार संगीत आणि सलमानची स्क्रीन प्रेझेन्स यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. बॅटल ऑफ गलवान हा चित्रपट सलमान खान यांनी सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली प्रोड्यूस केला असून, दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केलं आहे.
स्क्रिप्ट असतानाही स्क्रिप्टशियाव घडला रुबाब! अनोख्या मेकिंग स्टोरीने ‘रुबाब’ चर्चेत-
चित्रपटाचं संगीत सलमान खान फिल्म्स म्युझिक लेबलअंतर्गत रिलीज झालं असून, सोनी म्युझिक इंडिया ही त्याची अधिकृत म्युझिक डिस्ट्रीब्यूशन पार्टनर आहे. शौर्य, बलिदान आणि जिद्दीची कथा मांडणाऱ्या या चित्रपटात चित्रांगदा सिंहही महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
