‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’ ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; पाच दिवसांत कमाईचा ‘हा’ टप्पा केला पार

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T103654.867

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट ईदच्या मुहूर्वावर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात ‘या’ सिनेमाला मोठं यश आलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


‘या’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसचे कलेक्शन जाणून घ्या…

सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा २१ एप्रिल २०२३ दिवशी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने १५. ८१ कोटींची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी, २५.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २६.६१ कोटी कमावले आहे.

चौथ्या दिवशी १०. १७ कोटी आणि पाचव्या दिवशी तर ७.५० कोटींची कमाई केली आहे. अशाप्रकारे आतापर्यंत या चित्रपटाने ८४. ३४ कोटींचा कलेक्शन जमवला आहे. ईदच्या दिवशी आणि वीकेंडला या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. पण तरी भाईजान शाहरुखचा रेकॉर्ड ब्रेक करू शकला नाही.

‘हा’ चित्रपट १०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होणार

भाईजानचे (Salman Khan) चाहते त्याच्या चित्रपटाची गेल्या काही वर्षांपासून आतुरतेने वाट बघत होते. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने ४ वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केले आहे. त्याचा हा चित्रपट सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला नसला तरी चाहत्यांना मात्र खूप आवडला आहे.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

आतापर्यंत या चित्रपटाने ८५.३४ कोटींची कमाई केल्याने लवकरच हा चित्रपट १०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात चाहत्यांना अॅक्शन, रोमान्स आणि कॉमेडी बघायला मिळत आहे. एकंदरीत हा हलका- फुलका चित्रपट चाहत्यांचा चांगलाच मनोरंजन करत आहे.

चित्रपटगृहात मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर देखील रिलीज करण्यात येणार आहे. १०० कोटींमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. कथानकासह चित्रपटातील गाणीदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ नंतर भाईजानच्या ‘टायगर 3’ (Tiger 3) या चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us