Abhijit Bichukale : भाईजान अन् बिचुकलेच्या ‘त्या’ पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 14T144655.038

Salman Khan New Poster Abhijit Bichukale : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) याचे पोस्टर आणि ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. हे पोस्टर आऊट झाल्यावर एक मीम सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमाच्या नव्या पोस्टरमध्ये भाईजानचे विस्कटलेले केस चाहत्यांना दिसून येत आहे. तसेच त्याने डोळ्याला गॉगल देखील लावला आहे. हा ट्रेलर आऊट झाल्याची घोषणा करत भाईजानने हे पोस्टर शेअर केलं होतं. पण हे पोस्टर रिलीज झाल्यावर आता भाईजानच्या फोटोच्या जागी अभिजित बिचुकलेचा (Abhijit Bichukale) फोटो असलेलं एक मीम सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

भाईजानने केली बिचुकलेची कॉपी!

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मीममध्ये भाईजानने अभिजित बिचुकलेची कॉपी केल्याचं चाहत्यांना बघायला मिळत आहे. या मीममध्ये अभिजित बिचुकलेचे विस्कटलेले केस दिसत आहेत. फक्त भाईजानने गॉगल लावला आहे. तर बिचुकलेने चश्मा लावला असल्याचे दिसून येत आहे. या बिचुकलेच्या मीमवरदेखील ‘किसी का भाई किसी की जान’ असं लिहिले असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आता भाईजानने बिचुकलेची कॉपी केली असल्याचे चाहत्यांचे मत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)


चाहत्यांचे बिचुकलेल्या ‘भाईजान’ मीमवर कमेंट्स

अभिजित बिचुकलेच्या या मीमवर चाहत्यांनी मोठी पसंतीस दिली आहे. या मीमच्या पोस्टवर चाहत्यांचे कमेंट्स करत म्हणत आहेत की,”बिचुकले भाईजानला बघून बिचकला आहे, किसी का अभिजित किसी का बिचुकले, भाईजानने केली बिचुकलेची कॉपी, आम्ही याचा निषेध करत आहे. साताऱ्याची शान, भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री गचकले साहेब”. बिचुकलेल्या ‘भाईजान’ मीमवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

तसेच शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावर देखील अभिजित बिचुकलेने किंग खानला देखील सिनेमातील लुक त्याच्यासारखा असल्याचा दावा केला. अभिजित बिचुकले म्हणाला होता की,”मी लहान असताना संजू बाबाचे लांब केस होते. पण आता २०२२ साली आलेली हेअरस्टाईल माझी आहे. भाईजानच्या ‘बिग बॉस’मध्ये (Bigg Boss) किंग खानने मला बघितलं असावं. आणि त्यावरून त्याने माझी हेअर स्टाईल कॉपी केली असल्याचा दावा केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube