सामंथा रुथ प्रभूवर कोसळला दुःखाचा डोंगर, कठीण काळातच वडिलांचे छत्र हरपले…

प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामंथाच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आहे.

  • Written By: Published:
Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu : प्रसिद्ध अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सामंथाच्या वडिलांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. वैयक्तिक आयुष्यात चढ-उतार येत असतांना वडिलांचं छत्र हरपल्याने तिला मोठा धक्का बसला. तिच्या वडिलांचं नाव जोसेफ प्रभू (Joseph Prabhu) असं असून त्यांचं निधन नेमकं कशामुळे झालेलं आहे, याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

1500 रुपये ‘लाडक्या बहिणी’ला अन् अख्खी तिजोरी भावाला; सुषमा अंधारेंनी टाकली नवी गुगली 

काहीच तासापूर्वी सामंथाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली. मोजक्या शब्दात तिने सर्वकाही सांगितलं. बाय बाबा! आपली पुन्हा भेट होईपर्यंत… अस म्हणत सामंथाने हार्ट ब्रेकचा इमोजी शेअर केला. दरम्यान, काल एकीकडे सामंथा तिच्या ‘सिटाडेल हनी बनी’ सीरिजच्या सक्सेस पार्टीत सहभागी झाली होती. तर दुसरीकडे आज तिला या दु:खद प्रसंगाला सामोरं जावं लागतयं.

सामंथा रुथ प्रभूचे वडील जोसेफ प्रभू यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

नाशिक-कोकणला अच्छे दिन! पर्यटनाच्या समृध्दीसाठी केंद्राकडून मिळाला भरमसाठ निधी… 

गेल्या काही वर्षांपासून सामंथा तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या वादळामुळं खचत होती. या काळात आई-वडिलांनी तिला मोठा आधार दिला होता. माझे वडील माझे सगळ्यात मोठे सपोर्ट सिस्टम आहेत, असं ती नेहमी सांगायची. सामंथा तिच्या वडिलांची खूप लाडकी होती. तिचे वडील कायमच तिचा आधार देत.

सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य ऑक्टोबर २०२१ मध्ये वेगळे झाले.
तेव्हाही सामंथाचे वडील चर्चेत आले होते. लेकीच्या घटस्फोटाचा त्यांनाही मोठा धक्का बसला होता. त्यांनी सामंथा आणि नागा यांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या दोघांचं नातं सपलंय हे स्वीकारायला थोडा वेळ लागेल, अस म्हटलं होतं. तसेच दोघेही त्यांच्या आयुष्यात पुन्हा नव्याने पुढं जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, एकीकडे सामंथाचा आधीचा पती नागा चैतन्यच्या घरी हळदीची धूमधाम सुरू आहे. नागा आता शोभिता धुलिपालासोबत लग्नबंधनात अडकत आहे, तर दुसरीकडे, सामंथावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube