Territory Teaser Out: जंगलातील वाघाचा शोध अन्…;’टेरिटरी’ या थरारक सिनेमाचा टिझर आउट

Territory Teaser Out: जंगलातील वाघाचा शोध अन्…;’टेरिटरी’ या थरारक सिनेमाचा टिझर आउट

Territory Teaser Out: विदर्भातील जंगलाच्या टेरिटरीची (Territory Marathi Movie) थरारक कहाणी असणारा बहुचर्चित ‘टेरिटरी’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात येणार आहे. सचिन श्रीराम दिग्दर्शित या सिनेमात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट बघायला मिळणार आहे. येत्या १ सप्टेंबरला हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यामधील पांढरकवडा गावातील जंगलात (forest) नरभक्षक झालेला वाघ जंगलामधून अचानक गायब होतो. या नरभक्षक वाघाला मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी देण्यात येते. त्यानंतर मग त्या वाघाचा थरारक पद्धतीने शोध घेतला जातो, यावर हा सिनेमा आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाच्या टीझरची सुरुवात जंगल आणि वाघाचा हल्ला अशी असल्याचे पाहायला मिळाले आहे.

यानंतर पोलीस त्या नरभक्षक वाघाचा कशा पद्धतीने शोध घेत असतात, हे सिनेमात दाखवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा टीजर कथानकाप्रमाणेच हटके आहे. या सिनेमातील काही दृश्य आणि कथानकामुळे या सिनेमाबद्दल कुतूहल व्यक्त केले जात आहे. या सिनेमाने अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवात पारितोषिक मिळवले आहे. कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, गंगटोक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, ग्रीन अॅकॅडमी अॅवॉर्ड्स, गोल्ड फर्न फिल्म अॅवॉर्ड्स अशा अनेक वेगवेगळ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये हा सिनेमा दाखवण्यात आला आहे.

Ishan Khattar लाईव्हचा कॅमेरा बंद करायचा विसरला अन् झालं असं काही…

त्यामध्ये या सिनेमाला पारितोषिक देखील देण्यात आले आहे. तसेच पुण्यामधील इंटरनशनल फिल्म फेस्टिवल, कान्स फेस्टिवल मार्केट, मेटा फिल्म फेस्टिवल, दुबई आणि मुंबई इंडि फिल्म फेस्टिवल या ठिकाणी या सिनेमाची निवड करण्यात आली आहे. या सिनेमात संदीप कुलकर्णी, किशोर कदम हे प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सचिन श्रीराम यांनी सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube