Sangharsh Yoddha : लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश…? ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil Trailer Launch : मराठ्यांचं वादळ धडकणार चित्रपटसृष्टीत घडवणार नवा इतिहास, अभी नही तो कभी नही, मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची जीवनकहाणी असलेला (Marathi Movie ) ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट आता 14 जून 2024 ला प्रदर्शित होत आहे. (Sangharsh Yoddha Movie ) मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते अंतरवाली सराटी येथे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.
चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. अख्खा महाराष्ट्र या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी पिंजून काढला असून रसिक प्रेक्षकांकडूनही या चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, विठ्ठल अर्जुन पचपिंड ,जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे पाटील, नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.
या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे , श्रीकृष्ण शिंगणे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
Mr And Mrs Mahi ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या…
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील” या चित्रपटातून घेतला जाणार आहे. एक मराठा कोट मराठा अशी साद अवघ्या महाराष्ट्राला या चित्रपटातून दिली असून , लाठीचार्ज आणि गोळीबाराचा आदेश कोणी दिला? हे देशाला समजलेच पाहिजे, मराठ्यांना आरक्षण तात्काळ जाहीर झालेच पाहिजे एवढच आम्हाला समजत, असे अनेक मुद्दे या चित्रपटाच्या माध्यमातून मांडले असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाची चर्चा आहे.
‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटाचा ट्रेलर बघून समाजात आनंदाचे वातावरण होत आहे. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच ट्रेलरही वादळी आणि तुफान आहे. एका सर्वसामान्य कार्यकर्त्याचा असामान्य प्रवास 14 जूनला मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.