Letsupp चांगल्या सिनेमाला प्रमोट करतंय… अभिनेते संजय मिश्रांनी लेट्सअपला दिली दिलखुलास दाद
Sanjay Mishra: तुमचा खूप-खूप आभार तुम्ही असं प्रकाराचा सिनेमाला प्रमोद करतात Thank you लेट्सअप मराठी.
Sanjay Mishra On Letsupp Film Reviews : सीक्वेल चित्रपटांपैकी एक असलेला ‘वध २’हा (Vadh 2) आज शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मर्डर पॅक्ड मर्डरमिस्ट्री असलेल्या या चित्रपटाला पहिला दिवशी प्रेक्षकांनी पसंती दिली. ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा (
Sanjay Mishra) व नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या जबरदस्त अभिनयाची प्रेक्षकांवर भूरळ पडलीय. तर लेट्सअपने लिहिलेल्या वध 2 च्या चित्रपट समीक्षणावर अभिनेते संजय मिश्रा यांनी मराठीतून प्रतिक्रिया दिली.
सोहम ग्रुपचे डिजिटल सीईओ आणि चित्रपट समीक्षक अमित भंडारी यांना वध दोन (Vadh 2) या चित्रपटावर रिव्ह्यू लिहिलाय. या रिव्ह्युच्या इन्टाग्रामवरील क्रिएटिव्हवर संजय मिश्रा लिहितात, तुमचा खूप-खूप आभार तुम्ही असं प्रकाराचा सिनेमाला प्रमोद करतात Thank you लेट्सअप मराठी. लेट्सअप मराठी चित्रपट, मालिकांबरोबर हिंदीतील चित्रपटांना कलाकारांना स्थान देतंय.
2022 मध्ये ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा व नीना गुप्ता यांचीच भूमिका असलेला वध हा चित्रपट आला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. या चित्रपटात दोघांनाही वयोवृद्ध दाम्पत्याची भूमिका निभावली होती. मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठविण्यासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जामुळे दोघांवर आर्थिक संकट आले होते, यावर हा चित्रपट होता. आता त्याचा पुढचा भाग वध दोनममध्ये आहे.
संजय मिश्रांचे मराठी प्रेम
ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठी नाटक लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी हिंदीत रंगभूमीवर आणले. या नाटकात संजय मिश्रा यांनी घाशीराम कोतवाल यांची भूमिका साकारली होती. तेव्हा लेट्सअपला त्यांनी खास मुलाखत दिली होती. त्यात ते मराठी नाटकावर भरभरून बोलले होते.
