Satish Kaushik : रशियन मुलींनी केली सतीश कौशिक यांची हत्या? महिलेच्या दाव्याने खळबळ

Satish Kaushik : रशियन मुलींनी केली सतीश कौशिक यांची हत्या? महिलेच्या दाव्याने खळबळ

Satish Kaushik Death :  अभिनेते सतीश कौशिक यांच्या मृत्यूला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणाला एक गंभीर वळण लागले आहे. सतीश कौशिक यांच्या मृत्यू हा हत्या असल्याचा आरोप आता करण्यात आला आहे. उद्योजक विकास मालू यांच्या पत्नी सान्वी मालू यांनी विकास यांच्यावर हा आरोप केला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

सतीश कौशिक यांच्या हत्येसाठी विकास मालू यांनी रशियन मुलींचा वापर केल्याचा आरोप सान्वी यांनी केला आहे. एक मुलाखतीमध्ये मालू यांनी हा आरोप केला आहे. सान्वी यांनी सांगितले की सतिश कौशिक व विकास मालू यांच्यात पैशावरुन वाद होते. सतीश यांनी माझ्या पतीला १५ कोटी रुपये दिले होते. सतीश त्यांच्याकडे हे पैसे परत मागत होते. पण विकास यांच्याकडे त्यांना परत द्यायया पैसे नव्हते, असे सान्वी म्हणाल्या आहेत.

Uddhav Thackeray : शरद पवार पंतप्रधान झाले तरी चालतील… पण तंगड्यात तंगडे घालू नका!

सतीश जेव्हा विकास यांच्याकडे पैसे मागत तेव्हा विकास परदेशात होते. भारतात परत आल्यानंतर तुमचे पैसे परत करेल असे विकास त्यांना म्हणाले होते. पण कोरोना काळात नुकसान झाल्याने विकास पैसे परत करु शकत नव्हते, असे सान्वी यांनी सांगितले आहे.

सतीश सतत पैशांची मागणी करत असल्याने मी सतीशची हत्या करण्यासाठी ब्ल्यू पील्स आणि रशियन मुलीचा वापर करणार असे विकास यांनी मला सांगितल्याचे सान्वी म्हणाल्या आहेत. सान्वी यांच्या या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे सतीश कौशिक यांच्या मृत्यू प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे.

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला फटकारलं, म्हणाल्या सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही

दरम्यान, सतीश कौशिक यांचे निधन ह्रदय विकाराने झाल्याचे सांगण्यात आले आहे. सतीश हे अत्यंत प्रतिभावान कलाकार होते. त्यांनी अनेक सिनेमात अभिनेते म्हणून काम केले होते तर अनेक सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर अभिनेते अनुपम खेर व अभिनेते अनिल कपूर यांनी अतिशय भावनिक पोस्ट लिहली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube