Hindi Movie : सारा अली खान दिसणार ‘या’ स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत

Hindi Movie  : सारा अली खान दिसणार ‘या’ स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) नेहमी प्रमाणे आपल्या वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता पर्यंतच्या चित्रपटांमध्ये ती तिच्या नटखट भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता मात्र अभिनेत्री सारा अली खान थेट ऐका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सारा अली खानचा आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan) चा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. या छोट्या टीजरमध्ये ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

सारा अली खानच्या आने आगामी चित्रपट ‘ऐ वतन मेरे वतन’ची घोषणा ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर करण्यात आली आहे.आज प्राईम व्हिडिओने सारा की ‘ऐ वतन मेरे वतन’चित्रपटाचा टीजर त्यांच्या युट्यूब चॅनलवर रिलीज केला आहे.

व्हिडिओमध्ये सारा एका खोलीमध्ये बंद आहे. ती रेडिओवर म्हणत आहे की, ‘इंग्रजांना वाटत की, त्यांनी भारत छोडोला चिरडले आहे. पण मुक्त आवाज दाबला जाऊ शकत नाही. हा हिंदुस्तानचा आवाज आहे.’ ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटाचा टीजर स्पष्ट करतो की, या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान थेट ऐका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘ऐ वतन मेरे वतन’ (Ae Watan Mere Watan)या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान में सारा अली खान भारताच्या महिला स्वातंत्र्य सैनिक उषा मेहता यांची भूमिका निभावणार आहे. उषा मेहता यांनी सिक्रेट रेडिओ सर्व्हिसच्या माध्यामातून सन 1942 मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानापासून सुरू झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सारा अली खानचा हा चित्रपट पाहणे खरोखरच मजेशीर असेल. ‘ए वतन मेरे वतन’ केवळ OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube