Saubai Jorat : ”सासूबाई जोरात” या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T115558.850

Saubai Jorat Marathi Movie: सासू-सुनेचं नातं विळ्याभोपळ्यासारखं असतं. पण सासू आणि जावयाच्या धमाल नात्याचं चित्रण सासूबाई जोरात (Saubai Jorat ) या चित्रपटात करण्यात आलं आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी लेखन-दिग्दर्शन केलेला आणि दमदार स्टारकास्ट असलेला हा चित्रपट २६ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

प्रभू शांती फिल्म प्रॉडक्शननं “सासूबाई जोरात” हा सिनेमा प्रस्तुत केला आहे. सिद्धार्थ प्रभाकर ढगे यांनी या चित्रपटाच्या लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर तेजस काळोखे यांनी संगीत, कुमार डोंगरे यांनी छायांकन केले आहे. या सिनेमात सयाजी शिंदे, संदीप पाठक, विजय पाटकर, मोहन जोशी, सुनील गोडबोले, उषा नाईक, आशा बिराजदार, विधी कुडिया, सिमरन क्षीरसागर, मिलिंद ढगे, सुयश लातूरे आदींच्या मुख्य भूमिका आहेत.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

“सासुबाई जोरात” ही गोष्ट आहे, आधुनिक सासू आणि तिच्या आधुनिक जावयाची. या सासूला तिच्या नवऱ्याचीही चिंता नाही. शिवाय ती जावयाशीही अत्यंत कठोरपणे वागते. या सासू आणि जावई यांच्यात काय होतं याची खूपच धमाल गोष्ट सासूबाई जोरात या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्यामुळे सासू-सुनेच्या अनेक प्रकारच्या लढाया आजवर सिनेमा सिरीयलमधून पाहिल्यानंतर आता सासु-जावयाची धमाल गोष्ट चित्रपटात बघणं हा मनोरंजक अनुभव ठरणार आहे, यात शंकाच नाही. त्याशिवाय चित्रपटात उत्तम स्टारकास्ट असल्याने हा सिनेमा अभिनयाची मेजवानीच ठरणार आहे.

Tags

follow us