Download App

Scam 2003 : स्कॅम 1992 नंतर ‘या’ गोष्टींमुळे गाजतीय हंसल मेहतांची ‘स्कॅम 2003’

  • Written By: Last Updated:

Scam 2003 : निर्माते हंसल मेहतांची वेब सीरिज (Web series) स्कॅम 1992 ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. या सीरिजमध्ये हर्षद मेहता स्कॅम दाखवला होता. यानंतर आता हंसल मेहता ‘स्कॅम 2003’ ही सीरिज घेऊन चाहत्यांच्या भेटीला आला आहेत. 2 सप्टेंबरला ही वेबसीरीज रीलीज झाल्यानंतर तिच्यावर प्रेक्षक भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर गदर 2 तर ओटीटीवर ‘स्कॅम 2003’ ही सीरिज धुमाकूळ घालत आहे.

2002 पर्यंत आरएसएसने तिरंगा का फडकवला नाही? मोहन भागवतांनी सांगून टाकलं…

या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीच्या भारतातील सर्वात मोठ्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची रंजक कहाणी दाखवण्यात आली आहे. या सीरिजमध्ये अब्दुल करीम तेलगीने कशा प्रकारे स्टॅम्प तयार करुन 30 हजार कोटी रुपयांच्या घोटाळा कसा केला हे दाखवण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. खऱ्या घटनेवर आधारित ही वेब सिरीज आहे.

Maratha Reservation :’मी गेलो तरी तुम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे; म्हणत तरुणानं संपवलं आयुष्य

सीरिज का पाहावी याचे चार रंजक मुद्दे?

तर ही सीरिज का पाहावी याचे चार रंजक मुद्दे सांगता येतील त्यामध्ये पहिल्यांदा येतो. तो या सीरिजचा विषय कारण आर्थिक गुन्हेगारांवर आधारित कमी सीरिज असल्याचं पाहायला मिळत. त्यामुळे हा विषय प्रेक्षकांना भावत आहे. या अगोदर स्कॅम 1992 ने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला होता. तसेच तिची कथा अत्यंत रंजक आहे. कॅरेक्टर निवडीवर आणि अनेळखी मात्र परफेक्ट कलाकारांमुळे ही सिरीज प्रेक्षकांना मोहिनी घालत आहे.

‘स्कॅम 2003’ सीरिजच्या ट्रेलरमध्ये अनेक सुप्रसिद्ध मराठी कलाकार बघायला मिळत आहे. अभिनेता शशांक केतकर, निखिल रत्नपारखी, भरत दाभोळकर, समीर धर्माधिकारी आणि चाहत्यांचा लाडका भरत जाधव (Bharat Jadhav) देखील या सीरिजमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये सीरिजविषयी मोठी उत्सुकता वाढली आहे. हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम 2003’ ही सीरिज 2 सप्टेंबर 2023 दिवशी प्रदर्शित झाली आहे. ही सीरिज सोनी लिव्ह या अॅपवर प्रदर्शित झाली आहे.

Tags

follow us