Shikhar Dhawan : टीम इंडियाचा ‘गब्बर’ ईडीच्या कचाट्यात; ‘या’ प्रकरणात ईडीने केली चौकशी

Shikhar Dhawan : टीम इंडियाचा ‘गब्बर’ ईडीच्या कचाट्यात; ‘या’ प्रकरणात ईडीने केली चौकशी

Shikhar Dhawan Online Betting App Case : भारतीय क्रिकेट संघात गब्बर या नावाने ओळखला जाणारा माजी फलंदाज शिखर धवन ईडीच्या (Shikhar Dhawan) कचाट्यात सापडला आहे. ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी चौकशी करण्याच्या उद्देशाने ईडीने धवनला बोलावले होते. त्यानुसार धवन आज सकाळी 11 वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाला होता. दरम्यान, याआधी माजी क्रिकेटर सुरेश रैनाला देखील ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. माहितीनुसार ईडी ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित आर्थिक देवाणघेवाण आणि संभावित गुंतवणुकीचा तपास करत आहे.

1xBet मुळे सुरेश रैनाची चौकशी

बेटिंग अ‍ॅप 1xBet ने माजी खेळाडू सुरेश रैनाला मागील वर्षात (Online Betting App Case) डिसेंबरमध्ये गेमिंग अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते. सुरेश रैना बरोबरील आमची भागीदारी स्पोर्ट्स बेटिंग अ‍ॅप फॅन्सना जबाबदारीसह बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करेल. यासाठी त्यांच्या या भूमिकेला रेस्पॉन्सिबल गेमिंग अ‍ॅम्बेसेडरचे नाव दिलं आहे. रैना अशा प्रकारे आमच्या ब्रँडचा पहिलाच अ‍ॅम्बेसेडर आहे असे कंपनीने त्यावेळी म्हटलं होतं.

Video : मोठी बातमी! क्रिकेटच्या मैदानात धावांचा पाऊस पाडणाऱ्या शिखर धवनकडून निवृत्तीची घोषणा

दरम्यान,ईडीने अवैध ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅपविरोधात तपास वेगवान केला आहे. याचे परिणामही दिसू लागले आहेत. सिनेकलाकार आणि क्रिकेटर मंडळींकडून अशा अ‍ॅप्सच्या जाहिराती केल्या जातात. या प्रकारांवर ईडीने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. प्रतिबंधित सट्टेबाजी प्लॅटफॉर्म्स 1xBet, FairPlay, Parimatch, Lotus365 साठी जाहिरात करण्याची प्रकरणे सुरू आहेत. ईडीने आपल्या तपासात याआधी क्रिकेटपटू हरभजन सिंग, युवराज सिंह, अभिनेता सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्याकडेही चौकशी केली आहे.

ईडी का करतेय चौकशी

मिळालेल्या माहितीनुसार हे सट्टेबाजी प्लॅटफॉर्म आपल्या जाहिरातींत 1xbat आणि 1xbat स्पोर्टिंग लाइन्स यांसारख्या दिशाभूल करणाऱ्या नावांचा वापर करत आहेत. या जाहिरातीत क्यूआर कोड असतात. याद्वारे युजर थेट सट्टेबाजी करणाऱ्या वेबसाइटवर पोहोचतात. हा प्रकार म्हणजे भारतीय कायद्याचं उघड उल्लंघन आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती करणाऱ्या काही प्रसिद्ध व्यक्तींना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार हे अ‍ॅप स्वतःला स्किल बेस्ड गेमिंग प्लॅटफॉर्मच्या रुपात दाखवतात. प्रचारही करतात. परंतु, ते बनावट एल्गोरिदमचा वापर करून बेकायदेशीर सट्टेबाजी सारखी कामे करतात.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात नवा ट्विस्ट; कुरिअर बॉयने ईडीवरच केले आरोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube