Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T162032.749

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा बादशाह अर्थात किंग खान (Shah Rukh Khan) सध्या जोरदार चर्चेत येत आहे. नुकतचं ‘आस्क एसआरके’ (Ask Srk) या सेशनच्या माध्यमातून त्याने चाहत्यांच्या सवालांना मजेशीर अंदाजात उत्तरे दिली आहेत. (jawan) एका चाहत्याने किंग खानला सांगितले की,”मला वाटतं की माझी मांजर तुझ्या प्रेमात आहे. (Dunki) यावर मजेशीर अंदाजात उत्तर देत असताना किंग खान (king khan) म्हणाला की,”मांजराला माझं प्रेम द्या… आता ज्यादिवशी कुत्र्यांना माझे सिनेमे आवडायला लागले आहेत, त्यादिवशी मी सेट असणार आहे.

किंग खानच्या एका चाहत्याने ‘आस्क एसआरके’ सेशनमध्ये त्याला काही सवाल विचारण्यात आले होते. माझ्या मित्राचा तू क्रश आहेस..काय करू?. यावर उत्तर देत किंग खान म्हणाला,”तुला काय करायचं आहे? मला सांग फक्त आता मी काय करू”. एका चाहत्याने त्याला विचारले की,”भावा तू जेवलास का?”. यावर उत्तर देत किंग खान म्हणाला की, भावा तू स्विगीमध्ये काम करतो का? पाठवशील का?. तर किंग खानच्या या ट्वीटला उत्तर देत स्विगीने लिहिले आहे की, आम्ही स्विगीमध्ये आहोत. पाठवू का? अशा सवालांना भन्नाट उत्तरे किंग खानने दिले आहे.

‘डंकी’ की ‘जवान’ कोणता सिनेमा करणं सर्वात कठीण होतं? यावर उत्तर देत असताना किंग खान म्हणाला की, ‘जवान’ हा सिनेमा अॅक्शनपट असल्याने तो करणं खूप अवघड होत असल्याचे यावेळी सांगितले आहे. आंघोळ करत असताना गाणं गुणगुणतो का? यावर देखील किंग खान उत्तर देत म्हणाला की,”नाही.. मला खूप कंटाळा येत आहे. तुम्ही नाईट क्लबमध्ये कधी आंघोळ करता का?” असे भन्नाट किस्से केले असल्याचे दिसून आले आहे.

तसेच आस्क एसआकरेदरम्यान एका चाहत्याने किंग खानला सिगरेट कायमची सोडली का? असा सवाल विचारला असता. या प्रश्नाचं उत्तर देत किंग खान म्हणाला की,”हा.. मी खोटं बोललो… मी त्या कॅन्सर स्टिकच्या आहारी गेलो आहे”. किंग खानने २०११ मध्ये एका मुलाखतीमध्ये सिगरेट ओढण्याविषयी मोठं भाष्य केलं होतं. तो म्हणालेला,”मला झोप येत नाही. दिवसाला मी १०० सिगरेट ओढतो असतो आणि ३० कप ब्लॅक कॉफी पित असतो.

Disha Patani Birthday: अवघे ५०० रुपये घेऊन मुंबईत आली अन् कोट्यवधींची मालकीण झाली!

किंग खानचा शेवटचा ‘पठाण’ (Pathaan) या सिनेमात झळकला होता. त्याचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर सुपरहिट ठरला होता. आता एटली कुमार दिग्दर्शित ‘जवान’ (Jawan) या सिनेमाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा देखील दिसणार आहे. शाहरुखचा हा सिनेमा 7 स्प्टेंबर 2023 रोजी चाहत्यांना भेटीला येणार आहे. तसेच त्याच्या ‘डंकी’ (Dunki) या सिनेमाची देखील चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube