Dunki Trailer: कॉमेडी, इमोशन अन् ॲक्शनचा तडका; शाहरुखच्या ‘डंकी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Dunki Trailer: कॉमेडी, इमोशन अन् ॲक्शनचा तडका; शाहरुखच्या ‘डंकी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

Shah Rukh Khan Film Dunki Trailer Release: पठाण आणि जवानच्या यशानंतर चाहते आता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan ) आगामी ‘डंकी’ (Dunki Movie) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बहुप्रतिक्षित चित्रपट 21 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. (Dunki Trailer Release) गेल्या काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता वाढली होती. आता निर्मात्यांनी कॉमेडी-अ‍ॅक्शन आणि इमोशनी भरलेला धमाकेदार ट्रेलर रिलीज करून किंग खानच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

टीझरमध्ये लंडनला जात असलेल्या पाच मित्रांची कहाणी दाखवण्यात आली आहे. मित्रांच्या या ग्रुपमध्ये विकी कौशल, तापसी पन्नू तसेच शाहरुख खान यांचा समावेश आहे. त्यानंतर, निर्मात्यांनी या सिनेमातील दोन गाणी देखील रिलीज केली आणि आता सर्वांची प्रतीक्षा संपवत धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

डंकी सिनेमाचा ट्रेलरमध्ये शाहरुख एका अनोख्या लूकमध्ये दिसत होता. तसाच तो ट्रेलरमध्येही दिसत आहे. शाहरुखच्या लूकने चाहते खूप प्रभावित होत आहेत. आता या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यासोबतच किंग खान ट्रेलरमध्ये हटके डायलॉग्स बोलताना दिसत आहे. या पॉवरपॅक्ड परफॉर्मन्स ट्रेलरवरून चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावला जात आहे. त्याचवेळी जवान आणि पठाणप्रमाणे ‘डंकी’ देखील थिएटरमध्ये मोठा गल्ला कमावणार, अशी अपेक्षा आहे.

Bade Miyan Chote Miyan : ‘या’ दिवशी येणार अक्षय कुमार अन् टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन कॉमेडीचा टीझर

चित्रपटाचा ट्रेलर चांगला दिसत असून, शाहरुख खान यावेळी पुन्हा काही तरी नवीन करणार असल्याचे बघायला मिळत आहे. हा चित्रपट चाहत्यांसाठी खास असणार आहे. खरंतर शाहरुख आणि तापसी पन्नूची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शाहरुख आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. शिवाय शाहरुख आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची ही पहिलीच जोडी आहे. यामुळे एकप्रकारे हे सर्व स्टार्स या चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube