शाहिद कपूर अन् क्रिती सेनॉनच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 08T131834.434

Shahid Kapoor-Kriti Sanon Movie: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांची जोडी लवकरच एका प्रेमकथेच्या चित्रपटात चाहत्यांना दिसणार आहे. ही पहिलीच वेळ आहे, शाहिद आणि क्रिती एका चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या या अनटोल्ड रोमँटिक चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर शनिवारी प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


शाहिद कपूर आणि क्रिती सेनन रोमान्स करताना दिसणार

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्या या आगामी प्रेमकथा चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरने चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. शनिवारी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा पोस्टर शेअर केला आहे. तरणने शेअर केलेली ही पोस्ट शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या अनटाइटल्ड आगामी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरबद्दल आहे.

या पोस्टरमध्ये शाहिद आणि क्रिती बाइकवर बसून रोमान्स करताना दिसत आहेत. तरणच्या म्हणण्यानुसार या चित्रपटात शाहिद कपूर आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. मॅडॉक चित्रपटाचे दिग्दर्शक दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमित जोशी, आराध्या या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Shreyas Talpade: ‘अब रुल पुष्पा का…’, ‘पुष्पा २’चा टीझर शेअर करत श्रेयस तळपदेची खास पोस्ट

या दोघांचा पहिला चित्रपट कधी रिलीज होणार?

चाहत्यांना पहिल्यांदाच शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेले नाही. मात्र चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तरण आदर्शने सांगितले की, शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा हा अनटायटल्ड चित्रपट या वर्षी ऑक्टोबर महिन्यात रिलीज होणार असल्याची माहिती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube