‘जवान’मधील अभिनयाबद्दल शाहरुख खानने केले स्वतःचे कौतुक; म्हणाला, ‘मेरा तो जवाब ही नहीं’
Shah Rukh Khan : बॉलिवूड किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. जवानाने आतापर्यंत ६०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. जवान रिलीज होऊन एक आठवडा उलटला आहे. दरम्यान, जवानच्या शानदार यशानंतर शाहरुख खानने शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. ज्यामध्ये त्याच्यासोबत दीपिका पदुकोणही (Deepika Padukone) दिसली होती. दोन्ही कलाकारांनी जवानच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले.
यावेळी मीडियाशी बोलताना शाहरुख खान म्हणाला की, नक्कीच, हा एक उत्सव आहे. वर्षानुवर्षे एखाद्या चित्रपटासोबत जगण्याची संधी फारच क्वचितच मिळते. जवानची निर्मिती चार वर्षांपासून सुरू होती. मात्र, आधी कोविड आणि नंतर वेळेच्या कमतरतेमुळे या चित्रपटाला चार वर्ष लागली. पण हा चित्रपट बनवण्यात अनेकांचा हातभार होता. विशेषत: दक्षिणेतील लोक जे 4 वर्षापूर्वी मुंबईत आले आणि येथे स्थायिक झाले. ते गेल्या चार वर्षांपासून या चित्रपटासाठी रात्रंदिवस काम करत मुंबईत राहत आहेत.
मी नेहमीच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा चाहता आहे. माझ्यासाठी इथे येऊन हा सिनेमा निर्माण करणे, ही माझ्यासाठी सर्वात जास्त आनंदाची गोष्ट आहे, असं शाहरुख म्हणाला.
Delhi : विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीत मोठ्या घडामोडी; केसीआर यांचे थेट PM मोदींना पत्र
याशिवाय किंग खानने चित्रपटातील सर्व स्टार कास्टच्या कामाचे आणि अभिनयाचे कौतुक केले आहे. शाहरुखने जवानमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता विजय सेतुपतीचा अभिनय उत्कृष्ट असल्याचे सांगितले. यानंतर त्याने स्वतःचे कौतुक केले. ‘मेरे लिए तो जवाब नही’, भारतीय चित्रपटसृष्टीत मी ३२ वर्षेपासून काम करत असल्याचं तो म्हणाला.
जवानने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाने या वर्षी प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाचे अनेक विक्रमही मोडीत काढले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 700 कोटींहून अधिक कमाई केली आहे. ही केवळ किंग खानच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर बॉलिवूडसाठीही आनंदाची बातमी आहे.