स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; मालिकेचे नाव अद्याप गुलदस्त्यात!
टीझरमध्ये शोचे मुख्य पात्र दाखवले असून क्रुशल आहुजा यांची युवराज शेखावत आणि कनिका कपूर यांची तारा ही भूमिका यातून बघायला मिळणार आहे.
Star Plus gave a glimpse of a new love story : मालिका विश्वात कायम चर्चेत असलेलं चॅनल म्हणजे स्टार प्लस ! आजवर स्टार प्लसने कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या प्रेमकथा सादर केल्या आहेत. कालांतराने या चॅनेलने अनेक आयकॉनिक रोमँटिक शो केले आणि अनेक व्यक्तिरेखा प्रेक्षकांना दिल्या ज्यांची आठवण आजही प्रेक्षकांना आहे. प्रेमाची परिभाषा पुढे घेऊन जात स्टार प्लस लवकरच एका नव्या प्रेमकथेचा गोडवा घेऊन येण्यासाठी सज्ज होत आहे.
आजच्या काळात प्रेक्षक नव्या कथा आणि मनाला भिडणाऱ्या प्रेमकथांची आतुरतेने वाट पाहत असताना अशा वेळी स्टार प्लस एक असा शो घेऊन येत आहे, जो प्रेमाची भावना आणि प्रेमाचा ताजातवाना अनुभव देण्याचं आश्वासन देत आहे. निर्मात्यांनी अद्याप शोचं नाव किंवा संपूर्ण तपशील जाहीर केलेले नसले तरी नुकताच रिलीज झालेल्या टीझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
युद्धातील बालकैदी ते देशाचं नेतृत्व; तारिक रहमान यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
या हृदयस्पर्शी टीझरमध्ये शोचे मुख्य पात्र दाखवले असून क्रुशल आहुजा यांची युवराज शेखावत आणि कनिका कपूर यांची तारा ही भूमिका यातून बघायला मिळणार आहे. टीझरमध्ये युवराज पियानो वाजवत आणि हळूवार गाणं गाताना दिसतो ज्यामुळे एक रोमँटिक वातावरण तयार होतं आणि त्यानंतर तारा खोलीत येते आणि त्याच्यासोबत सुंदर डान्स करते. त्यांच्या केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांना स्क्रीनवर एक आकर्षक जोडी पाहायला मिळणार असल्याची झलक यातून बघायला मिळते.
हा टीझर नव्या प्रेमकथेची सुंदर गोष्ट उलगडणार असून भावनांनी भरलेली एक नवी प्रेमकथा प्रेक्षकांना यातून अनुभवयाला मिळणार यात शंका नाही !टीझर लहान असला तरी प्रेक्षकांना युवराज आणि ताराच्या प्रवासाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता यातून निर्माण होते. वाढत्या उत्सुकतेमुळे हा आगामी शो प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी खास कहाणी दाखवून जाणार एवढं नक्की. ही नवी मालिका लवकरच स्टार प्लसवर येणार असून आता प्रेक्षकांना देखील याची उत्सुकता आहे !
