Quotation Gang : ‘कोटेशन गँग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शितच ‘या’दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Quotation Gang : ‘कोटेशन गँग’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शितच ‘या’दिवशी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

Quotation Gang First Look: सनी लिओनी (Sunny Leone) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी आता नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही वर्षांमध्ये सनी लिओनीमध्ये बराच बदल झाला असून तिने बॉलिवूडमध्ये (Bollywood) तिचं स्थान निर्माण केलं आहे. सनी सोशल मीडियावर (Social Media) कमालीची सक्रीय असून कायम नवनवीन ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स शेअर करत असते. आता बऱ्याच अपेक्षेनंतर अखेर सनी लिओनीने तिच्या ‘कोटेशन गँग'(Quotation Gang)या तमिळ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)


अभिनेत्रीने दोन पोस्टर शेअर केले आहेत. ज्यात सनी याआधी कधीही न दिसलेल्या अवतारात दिसणार आहे. पहिल्या पोस्टरमध्ये सनी ‘स्कर्टवर एक चेकर्ड शर्ट’ मध्ये दिसत आहे. यामध्ये ती प्रिया मणीच्या पात्रासोबत पाहायला मिळणार आहे. एका धाडसी ग्रामीण माफियाची भूमिका सनी साकारणार आहे. अभिनेत्रीने पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी कौतुक केले आहे.

प्रियामणी आणि श्रॉफ व्यतिरिक्त सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेत्री सारा अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विवेक कुमार कन्नन दिग्दर्शनात सनी लिओनी एक महत्त्वपूर्ण आणि आकर्षक भूमिका साकारते जी एक अभिनेत्री म्हणून पुन्हा छाप पाडणार आहे. या चित्रपटात तिला मारेकरी म्हणून दाखवण्यात आले आहे. जी एका निर्दयी टोळीची प्रमुख सदस्य आहे, जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे.

Sunny Leone: ‘रोमान्स क्वीन’ सनी लिओनी, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात

‘कोटेशन गँग’ व्यतिरिक्त सनीने अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ आहे. तिच्याकडे हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवा यांच्यासोबत एक शीर्षकहीन चित्रपट असून निर्मितीमध्ये एक शीर्षकहीन मल्याळम चित्रपट देखील आहे. अभिनेत्री सध्या ‘Splitsvilla X5’ होस्ट करत आहे आणि OTT वर ‘ग्लॅम फेम’ जज करण्यासाठी सज्ज झाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज