Sunny Leone: ‘रोमान्स क्वीन’ सनी लिओनी, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात

Sunny Leone: ‘रोमान्स क्वीन’ सनी लिओनी, आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात

Sunny Leone Upcoming Film: बॉलिवूडमध्ये (Bollywood) अभिनेत्री म्हणून जम बसवण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात उतरली. सनी अनेकदा अभिनय करत सिनेमाच्या निर्मितीची देखील धुरा सांभाळली आहे. आता सनी लिओन एका नवीन प्रोजेक्टसह (Malayalam Film) मल्याळम फिल्म इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. शीर्षक नसलेल्या मल्याळम प्रकल्पाच्या शूटिंगला सुरुवात केली असून एका व्हिडिओमध्ये सनीने टीमसोबत मुहूर्ताची पूजा करताना दिसली आहे.

या व्हीडिओमधून तिने नव्या प्रोजेक्ट्ससाठी ती सज्ज होताना दिसतंय. काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये सनी सध्या काम करताना दिसत असून आता ती मल्याळम चित्रपटाचा सुद्धा भाग होणार आहे. सनी लिओनीने यापूर्वी मामूतीच्या ‘मधुराजा’मध्ये एक भूमिका साकारली होती. तिने यापूर्वी ‘रंगीला’ आणि ‘शेरो’ या दोन मल्याळम चित्रपटांची घोषणा केली होती जे अद्याप रिलीज झाली नाही.

या सिनेमाबद्दल अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे, म्हणाली की, ‘मी या चित्रपटात अभिनय करणार आहे. चित्रपट चालण्याच्या दृष्टीने हे फायद्याचं ठरेल. बाकी गोष्टींवर काम सुरु आहे.’ असं सनी म्हणते. तसेच सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नसलं, तरी हा ड्रामा-थ्रिलर आहे, अशी माहिती यावेळी तिने दिली आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास देखील सनीला वाटतं आहे.

फिल्मफेअरमध्ये ‘आत्मपॅम्फ्लेट’ आणि ’बापल्योक’चा जलवा; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

दरम्यान सनी लिओनी सध्या ‘स्प्लिट्सविला एक्स’’ (Splitsvilla X) ची नवीन मालिका होस्ट करत आहे. याशिवाय तिच्याकडे आधीपासूनच एक मनोरंजक चित्रपट येत आहेत. तिच्याकडे अनुराग कश्यपचा ‘केनेडी’ आहे, ज्याचा प्रीमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला होता आणि एका कार्यक्रमात तिला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले होते. हा चित्रपट भारतात रिलीज होणार आहे. याशिवाय सनी ‘कोटेशन गँग’मध्येही दिसणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज