Amol Kolheच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगावर सुप्रिया सुळेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून चाहत्यांच्या भेटीला आले आहे. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. नुकताच ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा प्रयोग पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पार पडला आहे.
View this post on Instagra
या प्रयोगाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील हजेरी लावली होती. ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य बघितल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी एक खास पोस्ट शेअर करुन या महानाट्याच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
काय आहे नेमकी पोस्ट
सुप्रिया सुळे यांनी ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा प्रयोग बघितल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारीत ‘शिवपुत्र संभाजी ‘ या महानाट्याचा प्रयोग पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे बघितला आहे. हा अतिशय दर्जेदार असा कार्यक्रम आहे.
View this post on Instagram
खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी या महानाट्याच्या माध्यमातून अतिशय मोलाचे काम केले आहे. याबद्दल त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंद… तसेच पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा… आपणही हे महानाट्य अवश्य बघावे. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय जगताप तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
तसेच अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सुप्रिया सुळे यांचे आभार देखील मानले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या आजच्या प्रयोगास राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गदर्शक खासदार सुप्रियाताई सुळे यांची सन्माननीय उपस्थिती! खूप खूप धन्यवाद…!