Tamanna Bhatia : तमन्नाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

Tamanna Bhatia : तमन्नाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटीया ही दक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील तेवढीच लोकप्रिय आहे. तिच्या वैविध्यपूर्ण भूमिका, सौंदर्य आणि अभिनय यामुळे ती नेहमीच चाहत्यांची मन जिंकून घेत असते. त्यात आता तमन्ना जेव्हा नविनच चित्रपटसृष्टीमध्ये आली होती. तसेच जेव्हा ती जेमतेम दहावीमध्ये होती. तेव्हाच्या तिच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महापालिकेने दिला अल्टिमेटम

तमन्नाच्या पहिल्या-वहिल्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल…

या व्हिडीओमुळे टीन एजमधील तमन्नाच्या चित्रपटसृष्टीतील पदार्पणाची आठवण झाली आहे. या मुलाखतीचा रील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे. की, मी अजून शाळेय शिक्षण घेत आहे. मी 2005 मध्ये दहावीचा परिक्षा देणार आहे. त्यामुळे परिक्षेची तयारी करत आहे. मी जेव्हा चित्रपट साईन केला तेव्हा मी साडे तेरा वर्षांची होते. तर आता दहावीचं वर्ष पूर्ण करणार आहे.

दरम्यान तमन्नाने 2005 मध्ये ‘चांद सा रोशन चेहरा’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करून नंतर तेलुगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला. 75 पेक्षा जास्त चित्रपटांच्या अष्टपैलू करिअरसह, तिने सातत्याने उत्कृष्टता दाखवली आहे. 2023 मध्ये तिच्या वेब सीरिजने देखील समीक्षकांची प्रशंसा मिळवली. यामध्ये ‘जी कारदा,’ ‘लस्ट स्टोरीज 2,’ आणि ‘आखरी सच’ मधील उल्लेखनीय कामगिरीने तिने प्रेक्षकांची प्रसंशा मिळवली.

विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारत राहिला आहे अपराजित, जाणून घ्या आतापर्यंतचा इतिहास

तर रजनीकांत सोबतच्या ‘जेलर’ मधील ‘कावला’ गाण्यावरील तिच्या दमदार नृत्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. तिची फॅशन तिला ट्रेंडसेटर बनवते आणि शिसेडो या जपानी ब्रँडची पहिली भारतीय राजदूत म्हणून तिची नेमणूक झाल्याने तिचा जागतिक चाहतावर्ग वाढला आहे. तर कावला गाण्यामुळे तीला भारतीय शाकीरा देखील म्हटलं गेलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube