शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महापालिकेने दिला अल्टिमेटम
अहमदनगर : अतिक्रमणासंबंधी महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) तक्रार केल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडली होती. त्यांनतर आता मनपा प्रशासन अतिक्रमण धारकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. अतिक्रमण (Encroachment) धारकांनी तातडीने आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना मनपा आयुक्त पंकज जावळे (Pankaj Javale) यांनी दिल्या आहेत.
Gadkari मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार गडकरींची भूमिका
गेल्या काही वर्षापासून नगर शहराच्या चौकाचौकात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या टपऱ्यांमुळं वाहुतकीची कोंडी होते. याचा सर्वसामान्यांना त्रास होतो. त्यामुळं नगर मनपा हद्दीतील अतिक्रमणे हटववण्यासंदर्भात मनपा प्रशासन विशेष मोहीम राबवणार आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था या परिसरांमधील असलेल्या सर्व प्रकारची कच्चे-पक्के अतिक्रमणे, टपऱ्या, शेड, हातगाडया इत्यादी हटविण्यात येणार आहेत. यामध्ये विशेषतः पान टपरी, गुटखा, मावाविक्री, अवैध धंद्यावर कारवाई केली जाणार आहे. स्वत:हून या टपऱ्या काढून घ्या, अन्यथा जप्त करण्याचा इशारा मनपाने दिला.
तसेच शहर विद्रुपीकरणासाठी कारणीभूत असलेले बॅनर, फ्लेक्स, जाहिरात फलक, शुभेच्छा फलक, होर्डींग्ज यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. सदर बोर्ड/फलक लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन संबधित पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सक्तीने कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं.
शहरात सध्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक मंडळामार्फत प्रसादवाटप, भंडारा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच विविध ठिकाणी खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडया, स्टॉल्स लागलेले असतात. अशा सर्व संबधितांनी अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय खाद्यपदार्थांची विक्री तसेच तसेच महाप्रसाद भंडाऱ्याचे वाटप करून यये, सोबतच स्वच्छतेची काळीज घ्यावी, असेही आदेश देण्यात आले.