Tamannaah Bhatia: ‘बाहुबली द बिगिनिंग’ ला 9 वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली आठवण

Tamannaah Bhatia: ‘बाहुबली द बिगिनिंग’ ला 9 वर्ष पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली आठवण

Tamannaah Bhatia celebrates 9 years of Baahubali : सुप्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) आणि राशी खन्ना (Raashii Khanna) स्टारर ‘अरनमनाई 4’ (Aranmanai 4) चित्रपटाने तामिळ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा हॉरर-कॉमेडी सिनेमा हिंदीमध्ये कधी प्रदर्शित होतो, याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात होते. आता अभिनेत्रीने (Baahubali) ‘बाहुबली: द बिगिनिंग’च्या रिलीजची 9 वर्षे साजरी केली असून हा चित्रपट तमन्नाला पॅन इंडियाची अभिनेत्री म्हणून ओळख करून दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tamannaah Bhatia (@tamannaahspeaks)


तमन्नाने तिच्या सोशल मीडियावर चित्रपटातील बीटीएस शेअर केले असून या चित्रपटात काम करण हे तिचे स्वप्न कसे पूर्ण झाले हे यातून तिने सांगितलं आहे. 9 वर्षांपूर्वी, @ssrajamouli सरांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न साकार झाले. अप्रतिम कलाकारांसोबत या चित्रपटाचा एक भाग बनणे हे केवळ मजेशीरच नव्हत तर एक मोठा अनुभवही होता. प्रेक्षकांनी आमच्या चित्रपटाला दिलेल्या प्रेमाबद्दल तेव्हा आणि आत्ताही नेहमीच आभारी राहीन.

एसएस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाने तमन्ना एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून प्रस्थापित केली. अवंतिकाच्या भूमिकेतील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी तसेच समीक्षकांनी खूप कौतुक केले आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तमन्ना तिच्या प्रत्येक भूमिकेने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना प्रभावित करत आहे.

Tamannaah Bhatia: अभिनेत्री तमन्ना भाटिया ‘स्त्री’ मध्ये खास कॅमिओ करणार ?

अभिनेत्रीचा अलीकडील तमिळ हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘अरनमानाई 4’ ने बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड तोडले. 2024 चा पहिला हिट चित्रपट ठरला. सध्या, तमन्ना तेलगूमध्ये तिच्या पुढील चित्रपट ‘ओडेला 2’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पाइपलाइनमध्ये तिचा हिंदीत ‘ वेदा ’ही आहे. OTT आघाडीवर, तिच्याकडे ‘डेअरिंग पार्टनर्स’ आणि नीरज पांडेचा एक शीर्षकहीन चित्रपट आहे ज्यामुळे तिला इंडस्ट्रीतील सर्वात जास्त मागणी असलेल्या प्रतिभांपैकी ओळखली जाते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज