TV Serial : आई कुठे काय करतेमध्ये आला ‘तो’ क्षण, अरुंधतीच्या आयुष्याला नवं वळण

Aai Kuthe Kay Krte

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून स्टार प्रवाहची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तसेच ती टीआरपीमध्ये देखील आघाडीवर आहे. आता या मलिकेमध्ये आणखी एक वळण आलं आहे. त्यामुळे अरुंधतीच्या आयुष्याला नवं वळण मिळणार आहे. कारण आताअभिषेक आणि आप्पांच्या पाठिंब्यामुळे अरुंधतीच्या आयुष्यात सुखाचं चांदणं येऊ पहातंय. अरुंधतीला मुलीच्या मायेने जपणाऱ्या आप्पांनी अरुंधतीची पाठवणी देशमुखांच्या घरातूनच होणार असं ठामपणे सांगितलं. त्यामुळेच अरुंधतीची हळद, मेहंदी आणि विवाह देशमुखांच्या घरातच होणार आहे.

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना अरुंधतीने स्वत:च्या आवडी-निवडी बाजूला ठेवल्या. मात्र आशुतोषमुळे अरुंधतीच्या स्वप्नांना नवे पंख मिळाले.

Women’s Day : महिला दिनानिमित्त चित्रपटगृहात पुन्हा झळकणार ‘झिम्मा’

गाण्याची आवड जपता जपता आशुतोषच्या रुपात तिला आयुष्याचा साथीदार मिळाला. अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतकं भरभरुन प्रेम दिलं त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावले होते.

Tags

follow us