‘The Elephant Whisperers’ मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर खळबळजनक आरोप; म्हणाले…

‘The Elephant Whisperers’ मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर खळबळजनक आरोप; म्हणाले…

The Elephant Whisperers: ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्यूमेंट्रीला ऑस्कर (Oscar) पुरस्कार देण्यात आला आहे. या डॉक्यूमेंट्रीमध्ये (Documentary) बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याने काम केले आहे. परंतु या जोडप्याने दिग्दर्शिका (Director) कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटवर खळबळजनक आरोप केले आहेत. ४ ऑगस्ट दिवशी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये या जोडप्याने सिनेमा निर्मात्यांवर आर्थिक शोषण आणि छळ केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

तसेच बोमन आणि बेलीने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांचा खळबळजनक खुलासा केला आहे. या जोडप्याने दिलेल्या माहितीनुसार की, डॉक्युमेंट्री शूटिंगच्या वेळेस कार्तिकी गोन्साल्विस त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत असतं. परंतु या सिनेमाला ऑस्कर मिळाल्यावर तिचे वागणे अचानक बदल्याचे दिसून आले. ती अंतर राखून वागू लागली, असा खळबळजनक दावा त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे बेलीने आरोप करत सांगितले आहे की, तिला लग्नाचा सीन एका दिवसामध्ये शूट करायचा होता. परंतु तिच्याकडे त्यासाठी पैसे नसल्याने आम्हाला व्यवस्था करण्यास सांगितले होते. यासाठी १ लाख रुपये खर्च करण्यात आला. कार्तिकीने आम्हाला पैसे परत करण्याचे आश्वासन देखील दिले होते. परंतु ते पैसे तिने आजून देखील दिले नाहीत. जेव्हा आम्ही तिला कॉल करतो, त्यावेळेस ती व्यग्र असल्याचे सांगत आणि फोन ठेवून देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

Box Office Collection : ‘ओपनहायमर’ भारतात शंभर कोटींच्या क्लबमध्ये; ‘बार्बी’ची जगभरात छाप

तसेच पुढे या सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल बोलत असताना तिने सांगितले की, “आमच्या चेहऱ्यांमुळे तिला हा पुरस्कार मिळाला, परंतु तिने आम्हाला ऑस्कर अवॉर्डला हात देखील लावू दिला नाही. या डॉक्युमेंटरीनंतर आम्ही आमची शांतता गमावली. आम्ही मुंबईहून कोईम्बतूरला परत आल्यावर आमच्याकडे आमच्या घरी जाण्यासाठी देखील पैसे नव्हते. आम्ही तिच्याकडे प्रवासासाठी पैसे मागितले होते, तरी देखील ती आम्हाला पैसे देऊ शकली नाही, तसेच ती पुढे म्हणाली की, तिच्याकडे पैसे नाहीत आणि लवकरच ती पैशाची व्यवस्था करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube