आशा सेविकांच्या आयुष्यात दैनंदिन संघर्ष; चित्रपटाला प्रेक्षकांची दाद, सुनेच्या कामाने सासू भावूक
या चित्रपटाला प्रत्येक शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक आशा सेविकांना हा चित्रपट स्वतःचीच कथा वाटत आहे.
महिलांच्या संघर्षाला आणि त्यांच्या जिद्दीला सशक्तपणे मांडणारा ‘आशा’ हा चित्रपट सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. आशा सेविकांच्या आयुष्यावर, त्यांच्या दैनंदिन संघर्षांवर आणि समाजासाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाला प्रत्येक शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक आशा सेविकांना हा चित्रपट स्वतःचीच कथा वाटत आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने सलमान खानची चाहत्यांना खास भेट; ‘बॅटल ऑफ गलवान’ चित्रपटाचा टिझर लाँच
असाच एक हृदयस्पर्शी अनुभव एका शहरात पाहायला मिळाला. एक आशा सेविका असलेली सून आपल्या सासूला ‘आशा’ हा चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन गेली. चित्रपट पाहिल्यानंतर सासू भावुक झाली आणि तिने आपल्या सुनेच्या कामाचे मनापासून कौतुक केले. ‘आशा’ हा चित्रपट समाजाशी घट्ट नाते जोडत आहे.
दिपक पाटील दिग्दर्शित ‘आशा’चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात प्रदर्शित झाला आहे.
