एमपीनंतर आता ‘द केरला स्टोरी’ या राज्यात करमुक्त, खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

एमपीनंतर आता ‘द केरला स्टोरी’ या राज्यात करमुक्त, खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

The Kerala Story Tax Free in UP : सध्या देशात एका सिनेमाने धुमाकूळ घातला आहे तो म्हणजे ‘द केरला स्टोरी’… हा सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. यातच आता हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट यूपीमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह चित्रपट पाहू शकतात असे बोलले जात आहे, यासाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित केले जाऊ शकते. दरम्यान हा सिनेमा मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरून सध्या देशात जोरदार राजकारण सुरू आहे. काही राज्यांमध्ये यावर बंदी घातली जात आहे तर काही जण करमुक्त करण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, आता उत्तर प्रदेशमध्ये हा सिनेमा करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा खुद्द युपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

विशेष म्हणजे मुख्यमंत्री त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह मंगळवारी (9 मे) विशेष स्क्रीनिंगमध्ये चित्रपट पाहू शकतात. यापूर्वी मध्य प्रदेशात हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. त्याच वेळी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये यावर बंदी घातली आहे. या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. याच पार्शवभूमीवर तमिळनाडूमध्येही चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमागृहांनी घेतला आहे.

मोठी कारवाई! पुण्यात तीन कोटीहून अधिकची रोकड जप्त

या राज्यांमध्ये सिनेमाला बंदी
सिनेमा प्रदर्शित झाल्यांनतर एकीकडे मध्य प्रदेशमध्ये चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. द केरळ स्टोरी या चित्रपटाबाबत द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ममता बॅनर्जी सांगतात. तसेच हा चित्रपट अद्याप तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये प्रदर्शित झालेला नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube