Adipurush Trailer: प्रतीक्षा संपली! तब्बल ७० देशांत ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार ‘आदिपुरुष’चा ट्रेलर

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 06T112215.250

Adipurush Trailer : साऊथ स्टार प्रभासच्या (Prabhas) ‘आदिपुरुष’ या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. रामायणावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन ओम राऊतने (Directed by Om Raut) केले आहे. केवळ सिनेमा नव्हे तर, चाहते त्याच्या ट्रेलरची देखील आतुरतेने वाट बघत आहेत. नुकतीच या सिनेमाच्या ट्रेलर संबंधात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आता निर्मात्यांनी ट्रेलर कधी रिलीज होणार याची घोषणा केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


‘आदिपुरुष’ हा २०२३च्या बहुप्रतिक्षित सिनेमापैकी एक आहे. या सिनेमाचा ट्रेलर ९ मे २०२२ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’च्या टीमने या मेगा लॉन्च इव्हेंटची घोषणा करणारे पॅन इंडिया स्टार प्रभासचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या सिनेमाचा ट्रेलर एकाच वेळी ७० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यासाठी आता ‘आदिपुरुष’ या सिनेमाची टीम जय्यत तयारी करत आहे.

ओम राऊत दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित, या सिनेमाची न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रीमियरसाठी निवड झाल्याने या सिनेमाला अगोदरच एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या सिनेमाचा ट्रेलर केवळ भारतात नाही तर अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, हाँगकाँग, फिलीपिन्स, म्यानमार, श्रीलंका, जपान, आफ्रिका, यूके, युरोप, रशिया, इजिप्त आणि दक्षिण आशियाई प्रदेशांमध्ये लाँच केला जाणार आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

या अगोदर ‘आदिपुरुष’चा टीझर रिलीज झाल्यापासून त्यावरून मोठा गदारोळ सुरू झाला आहे. कधी रावणाच्या रूपावरून, तर कधी हनुमानाच्या, कधी रामाच्या लूकवरून जोरदार वाद रंगत असल्याचे दिसून येत आहेत. तर, दुसरीकडे रामनवमीच्या मुहूर्तावर ‘आदिपुरुष’चे नवे पोस्टर रिलीज करण्यात आल्याने बराच मोठा वाद झाला. यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी या सिनेमातील ‘हनुमाना’चा लूक देखील समोर आला, त्यावर बराच गदारोळ झाला होता. ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जून २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us