‘काही गुंते सहज सुटतात’ अन् U turn पर्यंतचा प्रवास, ‘Good Vibes only’चा ट्रेलर प्रदर्शित!

‘काही गुंते सहज सुटतात’ अन् U turn पर्यंतचा प्रवास, ‘Good Vibes only’चा ट्रेलर प्रदर्शित!

Good Vibes only Trailer: गेल्या काही दिवसापासून ‘गुड वाईब्स ऑन्ली’ (Good Vibes only) या बेवफिल्मचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. पोस्टर बघितल्यानंतर यामध्ये काहीतरी भन्नाट असेल याची कल्पना आली होती. त्यामध्ये आता नवी भर पडली आहे. या वेबफिल्मच्या (webfilm) ट्रेलर देखील एकदम अफलातून असल्याचे दिसून आले आहे. येत्या २७ जुलैपासून ‘गुड वाईब्स ॲान्ली’ चाहत्यांना प्लॅनेट मराठी ओटीटीवर आता बघता येणार आहे.

‘गुड वाईब्स ऑन्ली’ या मराठी सीरिजच्या (Marathi series) १ मिनिटे ४२ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती सर्फिंग कॅम्पच्या निमित्ताने एकत्र आल्याचे दिसून आले आहे. सुरूवातीच्या काळात खूप खटके उडणाऱ्या या दोघांमध्ये हळूहळू मैत्री निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. अतिशय सुरेख अशा या मैत्रीमध्ये धमाल दिसून आली आहे. तसेच सर्फिंग या वॅाटर स्पोर्टभोवती फिरणाऱ्या या कथेमध्ये मैत्रीची कथा हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्यात आल्याचे ट्रेलरमधून दिसून आले आहे.

आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी या वेबफिल्मच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रामध्ये एन्ट्री मारली होती. श्रवण बने आणि आरती केळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या या हलक्याफुलक्या, मनाला आनंद देणाऱ्या वेबफिल्मची कथा आणि दिग्दर्शन जुगल राजा यांचे असल्याचे यावेळी सांगण्यात आली आहे. सिल्क लाईट फिल्म्स प्रस्तुत या वेबफिल्मचे निर्माते जुगल राजा आहेत. प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले आहे की, “मैत्री या विषय याअगोदर अनेकवेळा हाताळण्यात आला आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

परंतु एखाद्या खेळातून फुलत जाणारी मैत्री अनेकवेळा पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. दिग्दर्शकांनी अतिशय रंजक पद्धताने हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तरूणाईला हा विषय निश्चितच आवडणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. याबरोबर सर्वच वयोगटाला ही वेबफिल्म आवडणारी असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. दिग्दर्शक जुगल राजा पुढे म्हणतात की, “या वेबफिल्मची कथा खूप साधी सरळ आहे.

एक समंजस, मनाने हळवी तरीही खंबीर अशी एका विवाहीत मुलगी आणि एक मस्तीखोर आणि गांभीर्य नसलेल्या मुलगा यांच्यामध्ये एका खेळाच्या माध्यमातून हळुवार फळत जाणारी मैत्रीची कथेची संकल्पना असल्याचे यावेळी सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube