TV Serial : अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

TV Serial : अभिनेत्री वैशाली ठक्कर आत्महत्या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर

मुंबई : कलर्स वाहिनीवरील ‘ससुराल सिमर का ‘ या मालिकेतील अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. त्या प्रकरणामध्ये आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ज्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे वैशाली ठक्कर हिने गेल्या वर्षी आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं होत. तो व्हिडीओ आरोपी राहुल नवलानीने यानेच बनवला आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये गोव्यातील एका हॉटेलमध्ये वैशाली राहुलसोबत तीन दिवस थांबली होती. त्याचकाळात आरोपी राहुलने तिचे व्हिडिओ बनवले होते. त्यामुळेच वैशालीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले होते. राहुलने याकाळात तिला लग्नाचे आश्वासनही दिले होते. काही काळापूर्वी न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पोलिस चालानातून ही बाब उघड झाली आहे.

वैशाली ठक्कर हिने ऑक्टोबर 2022 मध्ये इंदूरच्या साई बाग कॉलनीतील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील संजनाच्या भूमिकेतून वैशालीला खूप प्रसिद्धी मिळाली. वैशालीच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिचा शेजारी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा नवलानी यांच्याविरुद्ध कलम 306 (हत्येसाठी प्रवृत्त) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube