एकत्र चित्रपटांची वीस वर्षे आणि रितेश आणि जिनिलिया यांचं ‘वेड’

एकत्र चित्रपटांची वीस वर्षे आणि रितेश आणि जिनिलिया यांचं ‘वेड’

मुंबई : रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या एकत्र चित्रपटाला ३ जानेवारी रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. जे वेड मजला लागले तुजलाहि ते लागेल का? असं खरं तर नवीन प्रेमात विचारायचं असतं. परंतु रितेश आणि जिनिलिया या दोघांनाही हे वेड वीस वर्षांपूर्वीच लागलं होतं त्यांच्या एकत्र काम केलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या पहिल्या चित्रपटात. चक्क वीस वर्षे झाली पण वेड मात्र कमी झालं नाही. चित्रपट तयार होताच राहिले. बघता बघता मराठी चित्रपट निर्मितीच्या वेडानं झपाटलं आणि याच वेडापोटी मुंबई फिल्म कंपनी सुरु झाली तिलाही ४ जानेवारीला दहा वर्षे पूर्ण होत आहेत….

चित्रपट हे दोघांचंही कार्यक्षेत्र असल्यामुळे आणि मधल्या काळात अनेक दिग्दर्शकांच्या सोबत काम करीत असताना या क्षेत्रातलं महत्वाचं असं दिग्दर्शन करून बघावं अशी रितेशची इच्छा असणं स्वाभाविकच आणि त्यात त्याची सहचारिणी म्हणून जिनिलिया सामील होतीच. या वेडानं यश तर दिलंच पण आपण हे देखील करू शकतो हे सिद्ध झालं.

आता वीस वर्षांपूर्वी एकमेकांसोबत पदार्पण केलेली ही जोडी ‘वेड’ या नव्या कोऱ्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येते आहे. यात रितेश यांचा डबल रोल अभिनेता आणि दिग्दर्शक म्हाणून आहे तर जिनिलिया अभिनेत्री आणि निर्माती अशा डबल रोल मध्ये आहे. मराठी चित्रपटांच्या क्षेत्रात महत्वाचा अनुभव आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आशय असा हा डबल धमाका ‘वेड’ च्या रूपाने रितेश आणि जिनिलिया यांनी साकार केला आहे.

वेड हे केवळ प्रेमाचे नसते तर काही प्रकारच्या वेडात प्रेमाच्या स्पर्शाने दोघंही एका गुंगीत असतात तर आणखी एका प्रकारात थिल्लरपणाच्या ऐवजी स्थिरता आणि म्हणून शांतता असते. हीच कथा ‘वेड’ मध्ये गुंफली गेली आहे. महत्वाकांक्षी तरुण प्रेमात पडणं नवीन नसेल पण हे प्रेम त्याच्या जीवनाला जी कलाटणी देते ती कथा प्रत्यक्ष पडद्यावर बघूनच अनुभवावा असा आहे आणि अशी कथा साकार करणे कठीण आहे. त्यासाठी वेडे व्हावेच लागेल.

या ठिकाणी प्रेक्षकांना एक महत्वाची बाब जाणवणार आहे आणि ती म्हणजे या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया हे दोन अनुभवी कलाकार वीस वर्षानंतर पती-पत्नीच्या रुपात आपल्याला एक मनोरंजक कथा उलगडून दाखवणार आहेत. त्यामधून चित्रपटाच्या प्रत्येक क्षेत्रात या दोघांच्याही कामाची व्यापक ओळख होणार आहे. रितेश पती आणि दिग्दर्शक तर जिनिलिया पत्नी आणि अभिनेत्री यांच्यामधला समन्वय प्रेक्षकांना वेडाची नवी व्याख्या करायला लावेल इतके मात्र नक्की.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube