Aishwarya Rai चं समर्थन करत विवेक अग्निहोत्रींवर भडकली उर्फी जावेद

Untitled Design   2023 05 20T174940.116

Urfi Javed questioned to Vivek Agnihotri on Aishwarya Rai : प्रत्येक आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये भारतीयांच्या नजरा ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) या अभिनेत्रीनकडे लागलेले असते. विदेशी कार्यक्रमांमध्ये या अभिनेत्रीचा जलवा कायम बघायला मिळतो. (Red Carpet look) सध्या कान्स फेस्टिव्हल सुरु आहे. (Cannes Film Festival ) कान्स 2023 सुरु झाल्यापासून सर्वांचे डोळे ऐश्वर्या राय बच्चनचा लूक बघण्यासाठी मोठी उत्सुकता होती.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 16 ते 27 मे दरम्यान चालणार आहे. यादरम्यान अनेक भारतीय सेलिब्रिटी या फेस्टिव्हलला मोठी हजेरी लावत आहेत. मात्र सर्वांच्या नजरा ऐश्वर्या रायकडे लागले होते. ऐश्वर्याचे चाहते तिच्या रेड कार्पेट लूकची आतुरतेने वाट बघत होते. अखेर कान्समधून ऐश्वर्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा लुक बघून चाहत्यांनी तिला प्रोत्साहन देखील दिले आहे तर काहींनी तिची जोरदार खिल्ली उडवली.

Cannes 2023: असा भंगार ड्रेस कोण घालतं ? कान्स फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायच्या लूकची उडवली खिल्ली

यामध्ये दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील ऐश्वर्याच्या या लूकचा फोटो शेअर करत त्यांनी एक कॅप्शन दिलं होतं. या कॅप्शनमुळे अनेकांचं लक्ष वेधलंय त्यावरून आता उर्फी जावेदने देखील या वादात उडी घेतली आहे. तिने विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यांना सवाल करत तिने ऐश्वर्या रायचं समर्थ केलं आहे.

ट्विटमध्ये काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

विवेक अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये ऐश्वर्याच्या कान्समधील लूकचा फोटो शेअर केला यामध्ये एक व्यक्ती ऐश्वर्याचा ड्रेस सावरताना दिसत आहे. त्यावर अग्निहोत्री यांनी लिहिले की, तुम्ही ‘कॉस्च्युम स्लेव्हज’ ही टर्म ऐकली असेल. त्या बहुतेक मुली असताता पण या फोटोत एक मुलगा आहे. आता भारतातही अनेक महिला सेलिब्रेटिंसह ते दिसतात. पण या गैरसोय निर्माण करणाऱ्या फॅशनसाठी आपण एवढे मुर्ख का बनतोय.’ असं विवेक अग्निहोत्री यांनी म्हटलं.

या कॅप्शनमुळे अनेकांचं लक्ष वेधलंय त्यावरून आता उर्फी जावेदने देखील या वादात उडी घेतली आहे. तिने विवेक अग्निहोत्री यांच्या ट्विटला उत्तर दिले. त्यांना सवाल करत तिने ऐश्वर्या रायचं समर्थ केलं आहे. काय म्हणाली उर्फी जावेद पाहुयात…

ट्विटमध्ये काय म्हणाली उर्फी जावेद?

उर्फीने अग्निहोत्रींच्या ट्विटचा आधार घेत ट्विट केले आहे की, ‘मला हे जाणून घ्यायला आवडेल की, तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून पदवी घेतली आहे? असं वाटतं तुम्हाला फॅशनची खूप जाण आहे. खरंतर फॅशन चित्रपट तुम्हीच दिग्दर्शित करायला हवा होता.’ उर्फी जावेद आणि विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्विटवॉरने नेटकऱ्यांच लक्ष वेधलयं.

Tags

follow us