Urfi Javedची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; एकताच्या ‘या’ सिनेमात झळकणार

Urfi Javedची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; एकताच्या ‘या’ सिनेमात झळकणार

Urfi Javed Bollywood Entry: आपल्या हटके फॅशनमुळे कायम चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदच्या (Urfi Javed) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. उर्फी जावेद लवकरच बॉलिवूड (Bollywood) सिनेमात झळकणार असल्याची चर्चा सध्या सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) आगामी सिनेमासाठी उर्फीला विचारणा झाल्याची माहिती मिळत आहे. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi Javed (@urf7i)


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत उर्फीचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकता कपूरच्या आगामी ‘लव्ह सेक्स और धोका 2’ (Love Sex Aur Dhokha 2) या सिनेमासाठी उर्फी जावेदला विचारणा झाली आहे. या सिनेमामध्ये उर्फी मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून उर्फी आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यास सज्ज झाली आहे. उर्फी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याने तिच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे पाहायला मिळत आहे.

परंतु अद्याप ‘लव्ह सेक्स और धोखा 2’च्या निर्मात्यांनी किंवा उर्फीने आजून देखील अधिकृतरित्या याविषयी सांगितले नाही. लवकरच ती चाहत्यांना यासंदर्भात माहिती देईल असे सांगितले जात आहे. उर्फीने गेल्या काही दिवसापसरून ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ या हटके सिनेमाचं एक पोस्टर इंस्टास्टोरीवर शेअरकरण्यात आले आहे. हे पोस्टर शेअर करत असताना तिने लिहिले आहे की जेव्हा तुम्हाला लाइक्स आणि रिपोस्ट करता येतील तेव्हा तुम्हाला गुलाब आणि चॉकटेलट मिळेल,

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

‘लव्ह सेक्स और धोखा 2’ हा सिनेमा १६ फेब्रुवारी २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘लव्ह सेक्स और धोखा 2’ या सिनेमात उर्फी जावेदबरोबर ‘बिग बॉस १६’ मधील निमृत कौर अहलूवालिया देखील चाहत्यांना दिसून येणार आहे. २०१० मध्ये आलेल्या ‘LSD’ या सिनेमाचा हा सीक्वेल असणार याची चर्चा सुरु झाली आहे.

‘लव्ह सेक्स और धोखा’ या सिनेमामध्ये राजकुमार राव, नुसरत भरुचा आणि अंशुमान झा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसून येणार होते. तसेच ती ‘मेरी दुर्गा’ आणि ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या सिरीयलमध्ये उर्फीने काम केले आहे. परंतु करण जोहरच्या (Karan Johar) ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामुळे उर्फीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube