Varun Tej Engagement: वरुण तेज गर्लफ्रेन्ड लावण्या त्रिपाठीसोबत लवकरच करणार साखरपुडा!
Varun Tej Lavanya Tripathi Engagement : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता वरुण तेज (Varun Tej) गेल्या काही वर्षांपासून लावण्या त्रिपाठीला (Lavanya Tripathi) डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. आता अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर वरुण त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर म्हणजेच लावण्या त्रिपाठीबरोबर साखरपुडा करणार आहे. या महिन्यातच त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.
View this post on Instagram
साखरपुडा ‘या’ दिवशी होणार?
वरुण आणि लावण्या या दोघांचा शाही थाटात साखरपुडा होणार आहे. कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीमध्ये हैदराबादमध्ये त्यांचा साखरपुडा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. येत्या 9 जूनला शाही थाटामध्ये त्यांचा हा साखरपुडा पार पडणार आहे. अद्याप दोघांनी देखील त्यांच्या साखरपुड्याबद्दल काही देखील भाष्य केले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार साखरपुड्यानंतर काही दिवसांनी वरुण आणि लावण्या लग्नबंधनात अडकणार आहेत. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी ‘मिस्टर’ आणि ‘अंतरिक्षम’ या सिनेमामध्ये एकत्र झळकणार होते.मिळालेल्या माहितीनुसार 2017 पासून वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठी एकमेकांना डेट करत असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीचा चाहतावर्ग हा मोठा आहे.
View this post on Instagram
अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आता ते लग्न करणार असल्याने चाहते देखील त्यांच्या लग्नासाठी मोठे उत्सुक झाले आहेत. या दोघांच्या साखरपुड्याला अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. यामध्ये राम चरण, उपासना कोनिडेला, साई धरम तेज, अल्लू सिरीश, सुष्मिता कोनिडेला, श्रीजा कोनिडेला, पवन कल्यान, अल्लू अर्जुन आणि चिरंजीवी इत्यादींचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
Sirf Ek Banda Kafi Hai: मनोज बाजपेयींचा ‘‘सिर्फ एक बंदा..’ सिनेमा लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
वरुण आणि लावण्या सध्या इटलीमध्ये आहेत. दोघेही सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत आहेत.आता वरुण आणि लावण्या लवकरच साखरपुड्यासाठी हैदराबादमध्ये येणार आहेत. वरुण हा चिरंजीवीचा भाचा आहे, नागा बाबू यांचा मुलगा आहे. नागा बाबू अभिनेता आणि निर्माता म्हणून चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. ‘मिस्टर और अंतरीक्षम 9000 KMPH’ या सिनेमाच्या सेटवर वरुण आणि लावण्याची पहिली भेट झाली होती. पुढे त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रींचं रुपांतर प्रेमात झाल्याचे त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते.