धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते… ते एक युग होतं, ती होती एक भावना…
त्यांचं मूळ नाव धर्मसिंह देओल. पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील फगवारा गावात जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते…ते एक युग होतं, ती होती एक भावना, एक माणूस ज्याच्या नजरेत धगधगता निखारा आणि अंतःकरणात होती मऊशार कोमलता असं हे एक भन्नाट मिश्रण होतं. (Dharmendra) त्यांच्या स्मितात दडली होती एक प्रेमकविता अन् त्यांच्या आवाज होता बॉलिवूड च्या ही मॅन ची वीरता. कुत्ते… तुम्ही मै तुम्हारा खून पी जाऊंगा. या संवादाला त्यांच्या स्टाईल मध्ये धर्मेंद्र टच देऊन त्याला अजरामर करून टाकलं. बॉलीवूड मधले हिरो ज्यावेळी आता स्टाईल अंदाज या गोष्टींवर आपलं फायनल वाढवत होते त्यावेळी फिटनेसने स्वतःकडे लक्ष वेधून घेतलं. रुबाबदार राजबिंडा आणि मनानेही राजस असलेलं हे व्यक्तिमत्व.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या नभांगणात तेजाने झळकणारा एक तारा …धर्मेंद्र देओल. ज्यांनी १९६० ते १९६८ दरम्यान रुपेरी पडद्यावर रोमँटिक नायकाचे कोमल रंग भरले आणि पुढे १९७१ ते १९९७ पर्यंत धाडसी, थरारक ऍक्शन हिरो म्हणून अवघ्या देशाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. ३०६ चित्रपटांमधून त्यांनी आपल्या करिष्म्याचा ठसा उमटवला. बॉलीवूडने त्यांना दिलं एक नाव. ‘गरम धरम’ शालीन व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी आणि विनोदी संवादफेक यांचा अनोखा संगम म्हणजे धर्मेंद्र.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या नभांगणात तेजाने झळकणारा एक तारा …धर्मेंद्र देओल. ज्यांनी १९६० ते १९६८ दरम्यान रुपेरी पडद्यावर रोमँटिक नायकाचे कोमल रंग भरले आणि पुढे १९७१ ते १९९७ पर्यंत धाडसी, थरारक ऍक्शन हिरो म्हणून अवघ्या देशाच्या हृदयावर अधिराज्य गाजवलं. ३०६ चित्रपटांमधून त्यांनी आपल्या करिष्म्याचा ठसा उमटवला. बॉलीवूडने त्यांना दिलं एक नाव. ‘गरम धरम’ शालीन व्यक्तिमत्त्व, पिळदार शरीरयष्टी आणि विनोदी संवादफेक यांचा अनोखा संगम म्हणजे धर्मेंद्र.
त्यांचं मूळ नाव धर्मसिंह देओल. पंजाबमधील कपूरथळा जिल्ह्यातील फगवारा गावात जाट शीख कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील केवळ किशनसिंह देओल आणि आई सतवंत कौर. लहानपण साहनेवाल या खेड्यात गेलं, शिक्षण लुधियान्याच्या सरकारी शाळेत आणि १९५२ मध्ये रामगढिया कॉलेज, फगवारा येथून इंटरमिजिएट पूर्ण. ‘फिल्मफेअर न्यू टॅलेंट कॉन्टेस्ट’ जिंकून मुंबईत आगमन. १९६० मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून पडद्यावर पहिली झलक. त्यांनंतर ‘बॉयफ्रेंड’, ‘आए मिलन की बेला’, ‘हकीकत’ यांसारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिका.
स्त्रीप्रधान चित्रपटांमध्ये नायिकेच्या सावलीतही त्यांनी नायकाची नजाकत जपली.
पण मग आला टर्निंग पॉइंट … ‘फूल और पत्थर’ (१९६६)! त्या एका चित्रपटाने त्यांना सुपरस्टार बनवलं. रोमँटिकतेतून ऍक्शन कडे कल वाढला आणि प्रेक्षकांनी ही त्यांना आपलंस केलं. ‘मेरा गांव मेरा देश’, ‘सीता और गीता’, ‘राजा जानी’, ‘जुगनू’, ‘कहानी किस्मत की’ अशा असंख्य चित्रपटांनी ‘ऍक्शन हिरो’ची ओळख पक्की केली.
त्यांच्या अभिनयाला संवेदनशीलतेचा हात दिला ऋषिकेश मुखर्जी यांनी, ‘अनुपमा’ (१९६६) आणि ‘सत्यकाम’ (१९६९) या दोन चित्रपटांनी त्यांच्या अभिनयाचं वेगळं अंग दाखवलं. ‘सत्यकाम’ आजही त्यांच्या अभिनयातील शिखर मानला जातो. सत्तरच्या दशकात त्यांची जोडी हेमा मालिनी सोबत तुफान गाजली. ‘शराफत’, ‘सीता और गीता’, ‘राजा जानी’, ‘प्रतीज्ञा’, ‘शोले’, ‘चरस’, ‘आज़ाद’, ‘दिल्लगी’…
ब्रेकिंग : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन; वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
एकापेक्षा एक हिट्स!‘शोले’ मधील वीरू आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या विनोदी अभिनयाचं अप्रतिम दर्शन ‘चुपके चुपके’ आणि ‘प्रतिज्ञा’ मध्ये घडतं. त्यांचा सर्वात गोड रुपेरी पडद्यावर रोमँटिक प्रवास आशा पारेख सोबत होता … प्रेक्षकांनी या जोडीला पसंतीची पावती दिली.
‘आये दिन बहार के’, ‘आया सावन झूम के’, ‘समाधी’, ‘मेरा गांव मेरा देश’ असे यशस्वी चित्रपट त्या जोडीनं दिले.
त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक वेगळं वादळ आलं.हेमा मालिनी सोबत त्यांनी तब्बल ३५ चित्रपट केले, त्यापैकी २० प्रचंड यशस्वी ठरले. ऑन स्क्रीन रोमान्सला वस्तुनिष्ठतेची जोड मिळाली. ॲक्शन मारधाड पटातून नवा रूपाला आलेला हिमन पुन्हा नव्याने प्रेमात पडला. १९८० मध्ये धर्मेंद्र-हेमा विवाहबद्ध झाले. त्यांना दोन कन्या … ईशा आणि अहाना, तर पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्याकडून दोन सुपुत्र … सनी आणि बॉबी देओल.
सत्तरचे दशक त्यांच्या लोकप्रियतेचं शिखर होतं, ऍक्शन आणि कॉमेडी या दोन्ही क्षेत्रांत समीक्षक आणि प्रेक्षकांच्या हृदयात ते विराजमान झाले.
१९८० च्या दशकात ‘राम बलराम’, ‘नौकर बीवी का’, ‘बगावत’, ‘हुकूमत’ (१९८७) या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला.
‘हुकूमत’ त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. १९७६ ते १९८२ या काळात ते विनोद खन्ना सोबत दुसरे सर्वाधिक मानधन घेणारे नायक होते.
धर्मेंद्र यांनी केवळ अभिनयच नव्हे तर निर्मितीतही पाऊल टाकलं. १९८३ मध्ये ‘विजेता फिल्म्स’ या बॅनरखाली त्यांनी मुलगा सनी देओलला ‘बेताब’मधून लॉन्च केलं आणि चित्रपट सुपरहिट झाला… १९९० मध्ये ‘घायल’ या चित्रपटानं तर सात फिल्मफेअर पुरस्कार आणि राष्ट्रीय सन्मान पटकावला. ‘बरसात’ (१९९५) मधून बॉबी देओल आणि ‘सोचा ना था’ (२००५) मधून अभय देओलला त्यांनी ओळख दिली.
पंजाबी मातीशी नातं जपण्यासाठी त्यांनी ‘पुट्ट जट्टां दे’, ‘कुर्बानी जट्ट दी’ यांसारखे पंजाबी चित्रपटही केले. १९९८ मध्ये ‘प्यार किया तो डरना क्या’मधून त्यांनी पुनरागमन केलं. २००४ मध्ये राजस्थानातील बिकानेर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर लोकसभेचे सदस्य झाले.
‘अपने’ (२००७) मध्ये पहिल्यांदाच सनी आणि बॉबीसोबत पडद्यावर आले… वडील आणि मुलांचे नाते जिवंत केले. ‘लाइफ इन अ… मेट्रो’, ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटांनी त्यांचा पुनर्जन्म घडवला. वयस्कर झालेला फिटनेस फ्रीक हीमॅन चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांनी थोडा थकलेला थरथरत्या हातांनी हिरोईनचा हात आपल्या हातात घेणार …
पंप पावणाऱ्या आवाजातला घोगरेपणा अधिकच गहिरा होत गेलेला जाणवला… २०११ मध्ये ‘यमला पगला दीवाना’ या कौटुंबिक धमाक्यात पुन्हा ते झळकले. त्याच वर्षी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोचे जज म्हणून त्यांनी टेलिव्हिजनवरही आपली मोहिनी पसरवली. धर्मेंद्र यांना त्यांच्या अफाट योगदानासाठी अनेक सन्मान मिळाले …१९९७ मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, आणि २०१२ मध्ये भारत सरकारकडून पद्मभूषण हा तृतीय सर्वोच्च नागरी सन्मान.
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र गेल्या सहा दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. त्यांचा ‘इक्किस’ हा शेवटचा चित्रपट येत्या 25 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून कारकिर्दीची सुरुवात केली. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘यादों की बारात’, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘नौकर बीवी का’, ‘फूल और पत्थर’, ‘पत्थर’ आणि ‘घायल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
