Katrina Kaif अन् विकी कौशलची अशी झाली होती पहिली भेट; खुलासा करत म्हणाला… 

Katrina Kaif अन् विकी कौशलची अशी झाली होती पहिली भेट; खुलासा करत म्हणाला… 

Vicky kaushal Katrina Kaif: अभिनेता विकी कौशल्य (Vicky kaushal) नुकताच एका मुलाखती दरम्यान त्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल खुलास केला आहे. तेव्हा त्याने सांगितले की त्याची पत्नी कतरिनाने त्याचा लग्नानंतरचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा केला होता. ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये विकीने हा खुलासा केला आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता विकी कौशल सध्या चर्चेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)


विकीच्या या चित्रपटाचे प्रमोशन सुद्धा जोरदार सुरू आहे. तर दुसरीकडे विकी कौशल व त्याची पत्नी कतरिना कैफ हे एकामागून एक त्यांच्या आयुष्यातील सिक्रेट्स त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. विकी नुकताच त्याच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचा प्रमोशनसाठी अभिनेत्री सारा अली खान सोबत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये आला होता. तेव्हा त्याने लग्नआधीचा आणि लग्नानंतरचा वाढदिवस यात काय फरक आहे? आणि कतरिनाने तो कसा साजरा केला? याचा खुलासा केला आहे.

विकी आणि कतरिनाच्या लग्नाला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. विकीने सांगितले की गेल्या वर्षीचा वाढदिवस हा त्याचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस होता. तो वाढदिवस विकिने त्याच्या मित्रांसोबत साजरा केला होता. तेव्हा कतरिनाने प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची काळजी घेतली. कतरिनाही त्या ग्रुपमध्ये मिक्सअप झाली व त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून आनंदाने माझा वाढदिवस साजरा केला.

या शोमध्ये विकीने असाही खुलासा केला की, आमच्याबद्दलच बोलायचे झाले तर, कतरिना प्लॅनिंग मध्ये सर्वोत्तम आहे. पण प्लॅनिंगच्या बाबतीत माझं डोकं काम करत नाही. विकीने त्याच्या लग्नातील सुद्धा एक सिक्रेट चाहत्यांसोबत शेअर केले ते म्हणजे विकीने सांगितले की, लग्नाच्या एक दिवस अगोदर त्याने खूप ड्रिंक केली होती. त्याचा हँगओव्हर लग्नाच्या दुसऱ्या दिवशी उतरला होता.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

तसेच विकीला लग्नाअगोदर आणि लग्नानंतर काय काय बदलले असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने उत्तर देताना म्हटले की लग्नाच्या एक दिवस अगोदर मी सिंगल होतो. आणि लग्नानंतर मी डबल झालो. विकी आणि कतरिनाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, विकी कौशलचा ‘सेम बहादुर’, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’, ‘मेरे मेहबूब मेरे सनम’ आणि ‘डॉंकी’ या चित्रपटांचा समावेश आहे. तर कतरिनाचा ‘टायगर 3’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ सध्या चर्चेत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube