त्यासाठी आम्ही जीव तोड मेहनत घेतली; “वॉर 2 च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादावर ऋतिक भावूक

त्यासाठी आम्ही जीव तोड मेहनत घेतली; “वॉर 2 च्या टीझरला मिळालेल्या प्रतिसादावर ऋतिक भावूक

We worked hard Hrithik gets emotional on the response to the teaser of War 2 : भारतातील सर्वात लोकप्रिय सुपरस्टार्सपैकी एक असलेले ऋतिक रोशन त्यांच्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझी ‘वॉर 2’ च्या टीझरला मिळालेल्या अफाट प्रतिसादामुळे खूप आनंदी आहेत. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर अक्षरशः वादळ उठले तसेच ऋतिक, एनटीआर, कियारा अडवाणी, आणि दिग्दर्शक आयान मुखर्जी यांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा झाली.

सिंधू करार स्थगित होताच पाकिस्तानच्या मदतीला चीन; पाणी अन् विजेसाठी चीनचा प्रोजेक्ट सुरू..

या चित्रपटात ऋतिक पुन्हा एकदा सुपर-स्पाय कबीर च्या भूमिकेत दिसणार असून, यंदा तो अधिक स्टायलिश, इंटेंस आणि अ‍ॅक्शनने भरलेला अवतार घेऊन परततो.ऋतिक म्हणाला ,”वॉर ही फ्रँचायझी माझ्यासाठी खूप खास आहे. वॉर 2 चा टीझर लोकांना किती आवडतोय हे पाहून खूप आनंद होतोय. हा फार मोठ्या स्केलवर बनवलेला चित्रपट आहे आणि ती एक भव्य अ‍ॅक्शन अनुभव बनावा म्हणून आम्ही आमचे सर्व काही दिलं आहे.”

Hansika Motwani : हंसिकाचं घायाळ करणारं फोटोशूट; निळ्या साडीत दिसतेय हॉट

तो पुढे म्हणाला ,”मी लहानपणापासून अ‍ॅक्शन शैलीचा मोठा चाहता आहे आणि अशा चित्रपटांमध्ये काम करताना मला खूप मजा येते. कबीर या पात्रामुळे मला गेल्या अनेक वर्षांत खूप प्रेम मिळालं आहे, आणि पुन्हा एकदा हे पात्र साकारताना मला खूप आनंद झाला.” ‘वॉर 2’ ही वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्समधील सर्वात जास्त अपेक्षित चित्रपट असून, टीझरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे ही फिल्म खऱ्या अर्थाने थिएटरचा अनुभव ठरणार आहे.

मेडिकल कॉलेजचं क्रेडिट वॉर, विखे-लंके वादाची वात पेटली; नगरच्या राजकारणात काय घडतंय?

ऋतिक म्हणाला ,”‘वॉर 2’ ला सुरुवातीपासून मिळत असलेले प्रेम आणि अभिप्राय पाहून मी खूप आनंदी आणि नम्र झालो आहे. आता केवळ प्रेक्षकांची प्रतिक्रिया मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”‘वॉर 2’ हा चित्रपट आदित्य चोप्रा निर्मित असून, अयान मुखर्जी दिग्दर्शक आहेत. कियारा अडवाणी मुख्य भूमिका साकारत असून, चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube