Video : “ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..” नाना पाटेकरांनी केला मैत्रिणींचा खास पाहुणचार

Video : “ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..” नाना पाटेकरांनी केला मैत्रिणींचा खास पाहुणचार

Nana Patekar: प्रसिद्ध मराठी अभिनेता नाना पाटेकर (Nana Patekar) यांना आपल्या अभिनयाने सर्वच चाहत्यांची मने जिंकली आहे. सिनेमा (Cinema) हिंदी असो किंवा मराठी नाना पाटेकर यांचा अभिनय कायम लक्षात ठेवण्यासारखा असतो. नाना पाटेकर हे उत्तम अभिनेते असण्याबरोबरच त्यांना जेवण बनवण्याची विशेष आवड आहे.

नुकतंच ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी (Actress Neena Kulkarni) यांनी नाना पाटेकरांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी नाना पाटेकरांच्या फार्म हाऊसची एक झलक दाखवली आहे. नीना कुळकर्णी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या भक्ती आचरेकर आणि नाना पाटेकर यांच्यासोबत फार्म हाऊसची सफर करत असल्याचे यामध्ये दिसून येत आहे. तसेच हे दोघेही एकमेकांचे जुने मित्र (old friends) आहेत. हमीदाबाईची कोठी या नाटकापासून मैत्री असलेले हे दोघं बऱ्याच काळानंतर एकत्र भेटले.

नीना कुळकर्णी यांनी शेअर केलेली पोस्ट…

ये सालों की दोस्ती का मज़बूत जोड़ है..छूटेगा नहीं
१९७८ साली रंगमंचावर हमीदाबाईची कोठी हया नाटकाच्या निमित्ताने एकत्र आलो… विजया मेहतांच्या तालमीत तयार होता होता , हमिदाबाई ची कोठी, महासागर अश्या अविस्मरणीय नाटकांचे प्रयोग करता करता, सहकलाकारांचे मित्र झालो. सुखदुःखात साथ देत,भांडत ,हसत मस्तीत जगलो. होता होता आपआपल्या पाऊलवाटा शोधल्या. पण नाती सुटली नाहीत.. संबंध तुटले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by neenakulkarni/नीना कुळकर्णी (@neenakulkarni)


आज ४५ हून अधिक वर्ष लोटली आहेत. तरीही स्नेह तसाच आहे, मैत्री वाढली आहे. मागील पानावरून पुढे! गप्पा, विनोद, चर्चा, प्रयोगातल्या आठवणींनी, दिवस रात्र अपुरे पडले! स्वतःच्या हातांने करुन वाढलेलं सुग्रास जेवण, नाना आणि त्याच्या परिवारा चं अगत्य, नाना च्या वाडीतली सुबत्ता… मन तृप्त झालं.

Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष

यावेळी नानांनी बनवलेलं जेवण, केलेली उठाबस आणि फार्म हाऊसमध्ये असलेल्या अनेक गोष्टीही दाखवल्या आहेत. नीना कुळकर्णींनी शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेत्री ईशा केसकरने या पोस्टवर हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. तर अभिनेत्री स्वाती चिटणीस यांनी “किती छान मैत्री” अशी कमेंट केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube