Yashvantrao Chavhan Center : आजपासून यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू…

Yashvantrao Chavhan Center : आजपासून यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू…

मुंबई : दरवर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हण सेंटर याठिकाणी ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे आयोजन केले जाते. त्याप्रमाणे याही वर्षी या ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ ला आजपासून सुरूवात होत आहे. यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे आयोजन गेल्या 13 वर्षांपासून केले जात असून हे या महोत्सवाचे 13 वे वर्ष आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि पुणे फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ चे आयोजन करण्यात येते.

Shah Rukh Khan च्या एका घड्याळाच्या किंमतीत तुम्ही घ्याल बंगला… किंमत ऐकून व्हाल शॉक

या चित्रपट महोत्सवादरम्यान प्रत्येक दिवशी चव्हाण सेंटरमधील प्रत्येक ठिकाणी पाच चित्रपट प्रदर्शित केले जातात. DCP, Blue ray, DVD, 35MM, DG Beta वापरून आणि या स्वरूपातील एकूण विविध विभागांचा मिळून महोत्सवात सुमारे 64 चित्रपट प्रदर्शित केले जातात.

या ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ मध्ये यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष म्हणजे अमृतमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे. तर या महोत्सवामध्ये चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना 200 रूपये तर इतरांना 300 रूपये तिकीट आकारण्यात येणार आहे. 13 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान हा चित्रपट महोत्सव चालणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube