Amruta-Prasad wedding : बिग बॉस मराठी फेम कपलचा शाही विवाह सोहळा; पाहा अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो

Amruta-prasad wedding : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi) चौथा सिझन चांगलाच गाजला. ज्यामध्ये अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांची जोडी चांगलीच जमली.

अमृता आणि प्रसादची या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि त्यानंतर आता कपलने एका शाही विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत.

अमृता आणि प्रसाद या दोघांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात त्यांचा रोमॅंटीक अंदाज पाहायला मिळत आहे.

या फोटोंमध्ये अमृता आणि प्रसाद या दोघांनी गुलाबी आणि पिवळ्या रंगाचं कॉम्बिनेशन असलेले पोशाख परिधान केला आहे.

या पारंपारिक लूकमध्ये ही जोडी अगदी क्युट आणि रोमॅंटीक दिसत आहे. तसेच हा विवाह सोहळा खास करण्यासाठी खास विवाहस्थाळ देखील भर घालत आहे.

तर या फोटोंना कॅप्शन देताना या कपलने लिहिले की, नात्यास नाव आपुल्या देऊ नकोस काही.. सा-याच चांदण्याची जगतास जाण नाही.. ना तालराग यांच्या बंधात बांधलेला.. स्वरमेघ मंजूळांचा बरसे दिशात दाही..!
