देशमुखांच्या हत्येचे ‘ते’ क्रूर फोटो समोर; त्या राक्षसांच्या चेहऱ्यावर अविर्भावही नव्हता

- संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
- या दरम्यान आता सीआयडीच्या हाती देशमुख यांच्या हत्येचे काही फोटो लागले आहेत जे व्हिडिओतून काढण्यात आलेल्या स्क्रीन शॉट जोडण्यात आले आहेत.
- हे फोटो अत्यंत क्रूर दिसत आहेत. जे पाहिल्यावर काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. देशमुख यांची हत्या झाली त्यावेळी हा व्हिडिओ लाईव्ह शेअर करण्यात आला होता.
- आरोपींच्या एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये हे व्हिडिओ शेअर करण्यात आले होते. सीआयडीच्या हाती आता हेच व्हिडिओ लागले आहेत. जे पुरावे म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत.