प्रसिद्ध क्रिकेटर सर्फराज खान अडकला काश्मीरी मुलीशी विवाहबंधनात; पाहा लग्नाचे फोटो

आयपीएल आणि रणजी स्टार सर्फराज खान काश्मीरी मुलीशी विवाहबंधनात अडकला आहे.

मुंबईकर सर्फराज आणि रोमनाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काश्मीरमधील शोपियांच्या पाशपोरा गावात राहणाऱ्या रोमना जहूरसोबत त्याचे लग्न झाले आहे.

रोमना आणि सर्फराज यांची दिल्लीत भेट झाली. दोघांच्या या भेटीचे रुपांतर मैत्रीत झाले आणि नंतर ते प्रेमात पडले. रोमना दिल्लीत एमएससी करत होती.

सर्फराजने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही स्थान मिळालेले नाही.
